व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. आपले फोटो, व्हिडीओ एकमेकांना पाठवू शकता तसेच स्टेटसला ठेवू शकता. यामध्ये वापरकर्त्यांना व्हिडीओ आणि व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळते. व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी ही मेटा आहे. त्याचे सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट्स आणि फीचर्स लॉन्च करत असते. ज्यामुळे वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्म वापरताना अधिक चांगला अनुभव मिळू शकेल. आतासुद्धा कंपनी ‘ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड व्हेरिफिकेशन’ (automatic security code verification)हे फिचर घेऊन आली आहे. तर या फीचरचा फायदा तुम्हाला नक्की कसा होणार हे जाणून घेऊयात.

व्हॉट्सअ‍ॅप हे अँड्रॉइडवरील मर्यादित संख्येसाठी बीटा टेस्टर्ससाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसाठी ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड व्हेरिफिकेशन फिचर घेऊन आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचर्स आणि अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo नुसार, या फीचरच्या मदतीने App कोणत्याही वापरकर्त्याच्या हस्तक्षेपाशिवाय मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहेत की नाही हे ऑटोमेटिकपणे व्हेरिफाय करण्याचा प्रयत्न करेल. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

हेही वाचा : इंटरनेट डेटा कमी वापरता? मग १ जीबी डेटा असणारे एकदा Airtel चे ‘हे’ प्लॅन्स वापरून पाहाच

या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप जो प्रयत्न करणार आहे त्या प्रक्रियेला ‘कि ट्रान्सपरन्सी’ (Key Transparency) म्हटले जाणार आहे. जे वापरकर्त्यांच्या संभाषणाची संपूर्ण सुरक्षा आणि गोपनीयता वाढवून ते सुरक्षित कनेक्शनचा वापर करत आहेत की नाही हे तपासून पाहणार आहे. तथापि, ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड व्हेरिफिकेशन अयशस्वी झाल्यास किंवा ते तुमच्याकडे उपलब्ध नसल्यास वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप मॅन्युअलपणे व्हेरिफिकेशन करण्याचे फिचर देखील प्रदान करते. रिपोर्टनुसार, हे फिचर अशा स्थितीमध्ये उपयोगाचे आहे जिथे ट्रॅडिशनल QR कोड किंवा मॅन्युअल व्हेरिफिकेशन करणे कठीण आहे.

ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड व्हेरिफिकेशन फिचर आणून WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नांशिवाय एंड-टू-एंड एन्क्रिप्शन व्हेरिफाय करत असताना अतिरिक्त सुरक्षा आणि सुविधा प्रदान करेल असे रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप नवीन युरोपियन युनियनच्या नियमाचे पालन करण्यासाठी अँड्रॉइडवर ‘थर्ड पार्टी चॅट’ सपोर्ट देण्यासाठी काम करत आहे.