WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. वापरकर्त्यांना Whatsapp वापरताना अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी कंपनी नवनवीन फीचर्स व अपडेट आणत असते. हे फिचर अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी असतात. आता असेच एक नवीन फिचर कंपनीने आयफोन (iOs) वापरकर्त्यांसाठी आणले आहे. हे फिचर नक्की काय आहे आणि कसे काम करते हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे हे नवीन फीचर ?

व्हॉट्सअ‍ॅपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणारी वेबसाइट wabetainfo नुसार, WhatsApp ने iOS 16 वापरकर्त्यांसाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांना स्टिकर्स बनवण्याचे फिचर मिळते. यासाठी ios वापरकर्त्यांना सब्जेक्टपासून फोटो वेगळा करून तो कोणत्याही चॅटमध्ये पेस्ट करून पाठवावा लागणार आहे. असे केल्याने हा फोटो त्यांच्या स्टिकर ऑप्शनमध्ये दिसेल. हे फिचर फक्त iOS 16 साठी रिलीज करण्यात आले आहे. तुम्हाला हे अपडेट जुन्या व्हर्जनमध्ये मिळणार नाही. वापरकर्ते इच्छित असल्यास, ते स्टिकरमध्ये मजकूर देखील जोडू शकतात.

हेही वाचा : Tech Layoffs: Meta मधून नोकरी गेलयावर कर्मचाऱ्याने लिंकडेनवर मांडली व्यथा; म्हणाला, “जो पर्यंत…”

वापरकर्त्यांचा अनुभव आणखी मजेदार करण्यासाठी WhatsApp ने एक नवीन फिचर आणले आहे. कंपनी आता तुम्हाला फोटो, व्हिडीओ, GIF आणि डॉक्युमेंटसह फॉरवर्ड करन्यायाची परवानगी देणार आहे. हे फिचर सध्या बीटा परीक्षकांसाठी आणले जाणार आहे. लवकरच ते सर्वांसाठी प्रसिद्ध केले जाणार आहे. या फीचरबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Meta च्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजच्या आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetainfo या वेबसाइटने या नवीन फीचरची माहिती दिली आहे. नवीन रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे , कंपनी बीटा परीक्षकांसाठी फॉरवर्डेड मेसेजचे फिचर आणत आहे. Google Play Store वरुन Android 2.23.8.22 अपडेटसाठी WhatsApp bita इंस्टाल केल्यावर असे दिसून आले, WhatsApp फॉरवर्ड केलेले फोटो, व्हिडीओ आणि GIF आणि डॉक्युमेंटसह डिस्क्रिप्शन लिहून फॉरवर्ड करण्याचे फिचर whatsapp आणत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp rolle out sticker maker feature for iphone ios 16 users tmb 01
Show comments