व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी व्हिडीओ, व्हॉइस कॉलद्वारे संवाद साधू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅप आपल्या iOS व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सतत नवीन फीचर्स लॉन्च करत असते. व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी ही मेटा आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर आणणार आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना ३१ जणांशी एकाच वेळी व्हिडीओ कॉल करता येणार आहे. WABetaInfo या वेबसाइटच्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच अ‍ॅप स्टोअरवर iOS 23.21.72 अपडेट आणले आहे.

मेटाच्या मालकीचे असलेले इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड आणि iOS वापरकर्त्यांना केवळ १५ लोकांपर्यंत ग्रुप कॉलिंग करण्याची परवानगी देत होते. मागील अपडेटमध्ये ग्रुप कॉलिंगसाठी ३२ जणांना सहभागी होता येत होते. मात्र वापरकर्त्यांना सुरुवातीला असे कॉल सुरु करताना केवळ १५ जणांना सहभागी करून घेता येत होते. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द

हेही वाचा : लॉन्चिंगआधीच iQoo च्या ‘या’ स्मार्टफोन्सचे फीचर्स झाले लीक, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…

आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉल कसा सुरु करावा?

१. सर्वात पहिल्यांदा तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप उघडावे.

२. त्यानंतर स्क्रीनखाली कॉल्स टॅब वर क्लिक करावे.

३. स्क्रीनच्या वरील भागात उजव्या भागात असलेल्या नवीन कॉल बटणावर क्लिक करावे.

४. त्यानंतर न्यू ग्रुप कॉल असा पर्याय तुम्हाला दिसेल.

५. तुम्हाला तिथे एक कॉन्टॅक्ट लिस्ट दिसेल.

हेही वाचा : लवकरच लॉन्च होणार विवोची X100 सिरीज; ५३ मेगापिक्सलचा कॅमेरा, पेरिस्कोप लेन्ससह मिळणार…, जाणून घ्या

६. त्यामधील ज्यांना तुम्हाला कॉलमध्ये जोडून घ्यायचे आहे त्यांच्या नावावर क्लिक करावे.

७. ज्यांना ग्रुप कॉलमध्ये जोडायचे आहे त्यांना जोडल्यानंतर कॉल सुरु करण्यासाठी व्हॉइस बटणावर क्लिक करावे.

नवीन अपडेटसह व्हॉट्सअ‍ॅप आता iOS वापरकर्त्यांना एकाच वेळी ३१ लोकांसह ग्रुप कॉल करता येणार आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना कॉलिंगचा चांगला अनुभव प्राप्त होणार आहे.