whatsapp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. तसेच याची मूळ कंपनी ही मेटा असून, त्याचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे आहेत. Whatsapp गेल्या काही दिवसांपासून आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स लॉन्च करत आहे. कंपनी आतासुद्धा वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर घेऊन आले आहे. तर हे फिचर नक्की कोणते आहे आणि त्याचा काय फायदा वापरकर्त्यांना होणार आहे ते आपण जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

WhatsApp वर आता तुम्ही तुमचे पर्सनल चॅट्स दुसऱ्यांपासून लपवून ठेवू शकणार आहात. यासाठी कंपनीने ‘Chat Lock’ फिचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. अजून जर का तुम्हाला याचे अपडेट मिळाले नसेल तर येत्या काही दिवसांमध्ये या फीचरचे अपडेट तुम्हाला मिळतील. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला जे चॅट लॉक करायचे आहे त्या चॅट विंडोमध्ये जावे लागेल. त्या युजरच्या प्रोफाईलवर जाताच तुम्हाला चॅट लॉकचा पर्याय दिसेल. हे सुरु करताच तुमच्या फोनसाठी जी सिक्युरिटी सेटिंग व असेल तीच या चॅटवर देखील लागू होईल.

हेही वाचा : टाटाचे टेक्नॉलॉजीत मोठे पाऊल! भारतात तयार होणार ‘मेड इन इंडिया आयफोन’, चीनला बसणार मोठा झटका

जर का तुम्ही whatsapp ला पासवर्ड सेट केला आहे तर या चॅटवर देखील पासवर्ड लागेल आणि हे चॅट एका वेगळ्या फोल्डरमध्ये शिफ्ट होईल. ज्या चॅट्सना तुम्ही हे फिचर लावणार आहात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोनाइलच्या स्क्रीनवर दिसणार नाहीत. नवीन मेसेज वाचण्यासाठी तुम्हाला whatsapp तुम्हाला तुमचा सिक्रेट फोल्डर ओपन करण्यास सांगेल. त्यानंतरच तुम्ही तुमचे चॅट्स वाचू शकता.

कंपनी काही दिवसांनी या फीचरमध्ये देखील काही अपडेट्स आणू शकते. हे फिचर लोकांची प्रायव्हसी आणखी सुरक्षित करण्यासाठी रोलआऊट करण्यात आले आहे. तसेच हे फिचर iOS आणि Android या दोन्ही वापरकर्त्यांसाठी सुरु करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp rollout chat lock feature private conversations ios and android users tmb 01