व्हॉट्सअ‍ॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी ही मेटा आहे. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स लॉन्च करते. जेणेकरून वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरणे अधिक सोपे जावे. आता लवकरच कमानी एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांनी पाठवलेले फोटो, व्हिडीओ आणि GIF आणि डॉक्युमेंट्सचे कॅप्शन एडिट करता येणार आहे. आतपर्यंत वापरकर्त्यांना केवळ टेक्स्टच एडिट करता येत होता. मात्र कंपनी या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपचे हे फिचर एडिट मेसेज फीचरप्रमाणेच काम करते. जे वापरकर्त्यांना फोटो किंवा व्हिडीओ पाठवल्यानंतर १५ मिनिटानंतर मीडिया कॅप्शनमध्ये बदल करण्याची परवानगी देते. याचा अर्थ फोटो , व्हिडीओ किंवा GIF मध्ये काही बदल करायचे असल्यास वापरकर्त्यांना ते पुन्हा रिपोस्ट करावे लागणार नाहीत. तर या फीचरच्या मदतीने पाठवलेल्या कॅप्शनमध्येच ते एडिट करू शकणार आहेत.

हेही वाचा : IFA 2023: सप्टेंबरमध्ये होणार सर्वात मोठा टेक शो; अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉनसह ‘या’ कंपन्या लॉन्च करणार आपली प्रॉडक्ट्स

‘एडिट मीडिया कॅप्शन’ फिचर मागील आठवड्यात iOS साठी WhatsApp च्या स्टेबल व्हर्जनवर पाहिले गेले होते. मात्र अनेकांना ते ऍक्सेस करता आले नाही. कहे फिचर येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये लॉन्च करण्या येईल असे कंपनीच्या डेव्हल्पर्सनी नमूद केले. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फिचर आणत आहे. जसे की HD फोटोज सेंड करणे, AI स्टिकर, अनेक डिव्हाइसवर अकाउंट उघडणे अशी अनेक फिचर कंपनीने लॉन्च केली आहेत.

Whatsapp चे HD फोटोज फिचर

मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने फेसबुकवर एका पोस्टमध्ये लिहिले, ‘व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो शेअरिंगला नुकतेच अपग्रेड मिळाले आहे. तुम्ही आता HD मध्ये फोटो शेअर करू शकता. पोस्टमध्ये, त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये एचडी किंवा मानक गुणवत्तेत फोटो कसे पाठवायचे ते सांगितले आहे. फोटो सेंटरिंग करण्याची प्रक्रिया सारखीच आहे, त्याच्या पुढे तुम्हाला HD चा पर्याय मिळेल.

व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, मानक गुणवत्ता डीफॉल्ट असेल. म्हणजेच तुम्ही फोटो निवडून पाठवलात तर फोटो मानक आकारात जाईल. HD मध्ये पाठवण्यासाठी तुम्हाला पर्यायावर क्लिक करावे लागेल. अ‍ॅपचे म्हणणे आहे की, हे वैशिष्ट्य काही आठवड्यांत सर्वांसाठी आणले जाईल. लवकरच एचडी व्हिडिओचा पर्यायही अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp rollout edit media caption feature photos videos gif 15 minutes for ios and android users tmb 01