प्रत्येकालाच आपले चांगले चांगले फोटो काढण्याची आवड असते. आपण ते फोटो काढल्यानंतर कोणाला सेंड करायचे असल्यास WhatsApp वरून देखील करत असतो. मात्र त्यावरून फोटो पाठवताना त्याची क्वालिटी किंवा साईझ कंप्रेस होते. Whatsapp ने आता असे होऊ नये व फोटो पाठवताना वापरकर्त्यांना एक चांगला अनुभव मिळावा म्हणून एक नवीन फिचर आणले आहे. हे फिचर नक्की काय आहे हे जाणून घेऊयात.
व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटकडे लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo च्या अहवालानुसार ‘HD फोटो ‘ हे फिचर आणले आहे. हे फिचर iOS आणि अँड्रॉइड या दोन्ही वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. याआधी फोटो पाठवताना त्याची साईझ किंवा क्वालिटी कंप्रेस होत असे. मात्र या फीचरच्या मदतीने तुम्ही पाठवलेले फोटो HD क्वालिटीमध्येच समोरच्याला दिसणार आहे.
हेही वाचा : ChatGpt चे निर्माते सॅम ऑल्टमन घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; जाणून घ्या सविस्तर
WABetainfo या वेबसाईटने HD Photos फीचरच्या रोल आउटची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, हे फिचर बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. ज्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून Android 2.23.12.13 आणि iOS 23.11.0.76 साठी whatsapp बीटा अपडेट डाउनलोड केले आहे. व्हॉट्सअॅपने मेसेज बबलमध्ये एक नवीन टॅगसुद्धा जोडला आहे. यामुळे या नवीन फीचरचा वापर करून फोटो कधी पाठ्वला जातो याची माहिती होण्यासाठी वापरकर्त्याला मदत करते. सध्या हे फिचर फक्त फोटोसाठी असू शकते. जर का तुम्हाला कोणाला व्हिडीओ पाठवायचा असेल तर तुम्हाला तो डॉक्युमेंट फाईलमध्ये पाठवू शकता.
व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी आणले Status Archive फिचर
मेटा व्हॉट्सअॅप बिझनेसवर वापरकर्त्यांना एक नवीन फिचर देणार आहे. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी हे फिचर वेळ वाचवणारे व खूप कामाचे ठरणार आहे. असे फिचर मेटा इंस्टाग्रामवर आधीपासून देत आहे. दरम्यान कंपनी व्हॉट्सअॅप बिझनेसवर Status Archive हे फिचर देणार आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्ते आपल्या स्टेटसला ३० दिवसांसाठी Archive करू शकणार आहेत. हे फीचर इंस्टाग्राम स्टोरी सारखे आहे जिथे यूजर्सना स्टोरी आर्काइव्ह करण्याचा पर्याय मिळतो.