WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. व्हिडीओ कॉल्स, व्हॉइस कॉल्स, स्टेट्स ठेवणे किंवा फोटो व्हिडीओ शेअर करणे अशी अनेक फायदे आपल्याला यामध्ये मिळतात. जगभरामध्ये २ अब्जापेक्षा अधिक लोकं whatsapp चा वापर करतात. मेटा ही whatsapp ची मूळ कंपनी आहे. या App मुळे लोकांची अनेक कामे सोपी झाली आहेत. काही सेकंदामध्येच तुम्ही तुमची कामे यावरून करू शकता. दरम्यान, कंपनीने iOS वापरकर्त्यांना अ‍ॅपवर एक नवीन फीचर दिले आहे. Meta ने Playstore वर WhatsApp iOS 23.8.78 चे अपडेटेड व्हर्जन सबमिट केले आहे.

या फीचरमुळे वापरकर्त्यांना पोलच्या प्रतिक्रिया मर्यादित करू शकणार आहेत. याचाच अर्थ तुम्ही मल्टीपल रिस्पॉन्सचा पर्याय बंद करू शकतात. आत्तापर्यंत अॅपवर असे व्हायचे की जर वापरकर्त्याने कुठेतरी पोल प्रश्न टाकला तर लोक एकापेक्षा जास्त उत्तरे देऊ शकत होते. मात्र नवीन फीचरमुळे आता वापरकर्ते पोल प्रश्नात फक्त एकच उत्तर देऊ शकणार आहेत. हे फीचर सुरू केल्यानंतर आता पोल प्रश्नाचा निकाल अधिक चांगला येईल कारण आतापर्यंत अनेक प्रतिसादांमुळे वापरकर्त्यांना योग्य उत्तर मिळू शकत नव्हते.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
Kaun Banega Crorepati Season 16 Amitabh Bachchan says I neither keep cash nor visit an ATM
KBC 16 : अमिताभ बच्चन ATM मध्ये कधीच गेले नाहीत, जया बच्चन यांच्याकडून घेतात पैसे, म्हणाले…

हेही वाचा : Vodafone-Idea युजर्सना मोठा धक्का! सहा महिन्यांची वैधता असणारा ‘हा’ जबरदस्त प्लॅन केला बंद

लॉन्च झाले Side By Side हे फिचर

WhatsApp ने आतापर्यंत वापरकर्त्यांसांठी अनेक फीचर्स आणि अपडेट्स लॉन्च केली आहेत. आता लवकरच त्यामध्ये आणखी एका फीचरचा समावेश होणार आहे. ‘Side By Side’ असे त्या फीचरचे नाव आहे. या फीचरचे टेस्टिंग सुरु आहे. या फीचरमुळे वापरकर्ते कोणत्या अडचणींशिवाय एका चॅटमधून दुसऱ्या चॅटमध्ये स्विच करू शकणार आहेत. यामुळे तुम्ही करत असलेल्या चॅट्समधून बाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे चॅट्स अधिक योग्य पद्धतीने कंट्रोल करू शकणार आहेत.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर Android टॅबलेट वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. हा नवीन मोड वापरकर्त्यांना त्यांच्या WhatsApp इंटरफेसची स्क्रीन स्प्लिट करण्याचा पर्याय देईल. या फीचरमध्ये वापरकर्ते एकाच वेळी दोन किंवा अधिक ठिकाणी चॅट्स करू शकणार आहेत. मात्र या फीचरमध्ये वापरकर्त्यांना चॅटिंगसाठी थोडी जागा कमी मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यांना हे फिचर नको असल्यास WhatsApp सेटिंग्जमध्ये जाऊन हे फिचर डिसेबल करू शकतील.

Story img Loader