जर का तुम्ही चॅट करण्यासाठी किंवा आपले फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासाठी WhtsApp चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर रोलआऊट केले आहे. व्हॉट्सअॅपने Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्रायव्हसी फिचर आणले आहे. व्हॉट्सअॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. याची मूळ कंपनी मेटा आहे. कंपनीने आणलेल्या या नवीन प्रायव्हसी फीचरचा काय उपयोग वापरकर्त्यांना होणार आहे ते पाहुयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी ‘फोन नंबर प्रायव्हसी फिचर’ (Phone Number Privacy Feature) रोलआऊट केले आहे. WhatsApp फीचर ट्रॅकर WABetainfo ने या फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या या फीचरच्या मदतीने कोणत्याही कम्युनिटीशी जोडले जात असताना वापरकर्त्याचा फोन नंबर मेंबर्सपासून लवपला जाऊ शकतो. सध्या कम्युनिटी अनाउंसमेंट ग्रुपमध्ये कम्युनिटी मेंबर्सची लिस्ट आधीपासूनच लवपलेली असते. मात्र कोणी वापरकर्ता प्रतिक्रियेच्या माध्यमातून मेसेजला रिप्लाय करत असेल तर त्याचा फोन नंबर दिसून येतो. नवीन प्रायव्हसी फिचर अंतर्गत मेसेजला रिप्लाय केल्यानंतरही तुमचा फोन नंबर लपलेला राहील याची खात्री केली जाईल. म्हणजेच दुसरे कम्युनिटी मेंबर्स तुमचा फोन नंबर पाहू शकणार नाहीत.
कम्युनिटी अनाउंसमेंट ग्रुपमध्ये कम्युनिटी पार्टीसिपेंट्सची यादी आधीपासून लावपलेली असते. वापरकर्ते मेसेजला रिप्लाय देऊ शकले नाहीत कारण तिथे त्यांचा फोन नंबर दिसेल. मात्र या नवीन फीचरमुळे ग्रुपमधील मेंबर्स आपला फोन नंबर न दाखवता देखील मेसेजला रिप्लाय देऊ शकतील. सुरुवातीला वापरकर्त्यांच्या एक निवडक ग्रुपसह याची चाचणी केली गेली. आता या फीचरला App च्या नवीनटन व्हर्जनमध्ये अधिक वापरकर्त्यांसाठी रोलआऊट केले जात आहे.
व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज कसे एडिट करायचे?
एडिट बटण या फीचरमुळे वापरकर्त्यांना आपले मेसेज एडिट करता येतात. मात्र त्यासाठी वेळेची मर्यादा आहे. कधीही मेसेज एडिट करता येत नाहीत.हे फिचर प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. मेसेज पूर्णपणे डिलीट करण्यापेक्षा हे एडिट करण्याचे फिचर अधिक चांगले आहे. मेसेज काढून टाकण्यापेक्षा तिथे दुरुस्ती करून सेंड करता येऊ शकतो. WhatsApp वर मेसेज पटकन कसा एडिट करायचा हे जाणून घेऊयात.
१. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचे WhatsApp ओपन करावे लागेल.
२. त्यानंतर तुम्ही कोणत्याही एका चॅटवर क्लिक करावे. ते ओपन करावे.
३. तुमच्याकडून जो चुकीचा मेसेज एडिट केला आहे त्यावर लॉन्ग प्रेस करावे.
४. लॉन्ग प्रेस केल्यानंतर तुम्हाला एडिट मेसेजचा पर्याय मिळेल. तिथे तुम्हाला मेसेज एडिट करता येईल.
हेही वाचा : WhatsApp Tips: व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज कसे एडिट करायचे? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स
मात्र लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला तुमचा मेसेज एडिट करण्यासाठी १५ मिनिटांची वेळ मर्यादा असणार आहे. १५ मिनिटानंतर त्यामध्ये तुम्हाला मेसेज एडिट करता येणार नाही. या वेळेनंतर तुमचा मेसेज चुकला असल्यास तुम्हाला डिलीट करावा लागणार आहे. हे फीचर आयओएस आणि अँड्रॉइड दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.