व्हॉट्सॲप हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. व्हॉट्सॲपमुळे कॉल, मेसेजिंग आणि व्हिडीओ कॉल सहज शक्य झालंय. असा क्वचितच कोणी असेल की जो व्हॉट्सॲपचा वापर करत नसेल. व्हॉट्सॲपचा वापर करताना अनेकदा आपण सुरक्षितता आणि गोपनीयता याकडे तितकं लक्ष देत नाही पण याच छोट्या-मोठ्या चुकांमुळे व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक होण्याचा धोका वाढतो. आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सॲप सुरक्षितपणे वापरू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या संदर्भात व्हॉट्सॲपनी ‘स्टे सेफ विथ व्हाॅट्सअ‍ॅप’ या सेफ्टी कॅम्पेनद्वारे व्हॉट्सॲप युजर्सपर्यंत जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.

टू स्टेप व्हेरिफिकेशन

युजर्सला सुरक्षितपणे व्हॉट्सॲपचा वापर करण्यासाठी व्हॉट्सॲपनी टू स्टेप व्हेरिफिकेशन फीचर आणलं, ज्याला सहा डिजिट पिनची आवश्यकता असते. व्हॉट्सॲप अकाऊंटच्या व्हेरिफिकेशनसाठी हा पिन महत्त्वाचा असतो, ज्यामुळे कुणीही तुमचं अकाऊंट हॅक करू शकत नाही.

हेही वाचा- Instagramवर आलं भन्नाट फिचर, आता कमेंट करणे होणार आणखी मजेशीर, कसं ते जाणून घ्या

प्रायव्हसी सेटिंग

कोणी तुमची वैयक्तिक माहिती पाहावी, हे तुम्ही ठरवू शकता. जसे की प्रोफाइल फोटो, लास्ट सीन, ऑनलाइन स्टेटस, अबाऊट स्टेटस हे कोणी पाहावे, हे तुम्ही ठरवू शकता.

ग्रुप प्रायव्हसी सेटिंग

व्हॉट्सॲप फक्त वैयक्तिक चॅटसाठीच प्रायव्हसी देत नाही तर ग्रुप सेंटिंगसाठीही व्हॉट्सॲपची खास प्रायव्हसी सेटिंग आहे. या सेटिंगच्या मदतीने तुम्हाला कोण ग्रुपमध्ये ॲड करू शकते, हे ठरवता येते. यामुळे तुम्ही व्हॉट्सॲपवर सेफ ग्रुप चॅटिंगही करू शकता आणि तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक होणार नाही.

लिंक डिव्हाइस चेक करा!

नियमित तुमचे लिंक डिव्हाइस चेक करा. तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंटवरील लिंक डिव्हाइस चेक करा आणि जर तुम्हाला एखाद्या अनोळखी अकाऊंटवरून लिंक दिसत असेल तर लगेच लॉग आऊट करा.

BSNLचा नवा प्लॅन! 49 रुपयांच्या एका रिचार्जमध्ये मिळणार सात ओटीटी अ‍ॅप्स, असा घ्या सुविधेचा लाभ

ब्लॉक आणि रिपोर्ट करा

जर तुम्हाला सुरक्षित चॅट करायचे असेल तर तुम्हाला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवरून कॉल आणि मेसेज येत असेल तर रिप्लाय करू नका. असे नंबर त्वरित ब्लॉक आणि रिपोर्ट करा. ब्लॉक केलेला नंबर तुम्हाला पुन्हा कॉल करू शकणार नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp safety features to avoid online scams and to safeguard your whatsapp account check privacy settings ndj