व्हॉट्सअ‍ॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. तसेच याची मूळ कंपनी असलेली मेटा कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. व्हॉट्सअ‍ॅप हे मेटाच्या मालकीचे आहे. व्हॉट्सअ‍ॅप एकनवीन फिचर सादर करत आहे. जे वापरकर्त्यांना ग्रुप कॉल शेड्युल करण्यास मदत करणार आहे. हे फिचर वापरकर्त्यांना अपकमिंग ग्रुप कॉल इव्हेंटबद्दल सर्व मेंबर्सना अलर्ट करण्यास सक्षम करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सअ‍ॅप डेव्हलपमेंटवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo प्लॅटफॉर्मने शेअर केलेल्या माहितीनुसार, हे फिचर मागील घोषणेदरम्यान डेव्हल्पमेंटमध्ये होते. तथापि, अँड्रॉइड व्हर्जन 2.23.17.7 साठी नवीन व्हॉट्सअ‍ॅप बीटा जे आता गुगल प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध आहे. निवडक बीटा परीक्षकांना ग्रुप कॉल शेड्युल करण्याची क्षमता तपासण्याची संधी आहे. याबाबतचे वृत्त livemint ने दिले आहे.

हेही वाचा : ChatGPT च्या OPenAI कंपनीत काम करण्याची संधी, मिळू शकतो तब्बत ३ कोटींपेक्षा अधिक पगार

रिपोर्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, वापरकर्त्यांचा एक उपसंच त्यांच्या संबंधित गृपमध्ये ग्रुप कॉल शेड्युल करण्यास सक्षम आहे. हे फिचर तुमच्या अकाउंटसाठी आहे का हे तपासण्यासाठी फक्त कॉल बटणावर क्लिक करावे. वापरकर्ता कॉलचा विषय निवडू शकतात. तसेच कॉलसाठी तारीख देखील शेड्युल करू शकतात.

या शिवाय वापरकर्त्यांना ग्रुप कॉल साठी व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल हे निवडण्याची सुविधा मिळते. एकदा ग्रुप कॉल शेड्युल केल्यावर ग्रुप चॅटमध्ये एक इव्हेंट आपोआप तयार होईल. जे लोक कॉलमध्ये सहभागी होण्याची निवड करतात त्यांना नियोजित प्रारंभ वेळेच्या १५ मिनिटे आधी एक नोटिफिकेशन प्राप्त होईल.

हेही वाचा : आता चॅट करणे होणार सोपे; WhatsApp वरून पाठवता येणार अ‍ॅनिमेटेड अवतार, जाणून घ्या|

नुकतेच कंपनीने एक नवीन फिचर आणले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नवीनतम बीटा व्हर्जन 2.23.16.12 अपडेटसह व्हॉट्सअ‍ॅप वर्तमान अवतार पॅकचे एक ऍनीमिटेड व्हर्जन सादर करत आहे. “या अलीकडील अपडेटमुळे काही बीटा परीक्षक शेवटी अ‍ॅनिमेटेड आयकॉनवर प्रयोग करू शकतात,” असे WABetaInfo या व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्सचे परीक्षण करण्याऱ्या वेबसाइटने सांगितले. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अवतार क्रिएशन पेज, मेटा मधील AI चा वापर करून एका फोटोमधून वैयक्तिक अ‍ॅनिमेटेड अवतार तयार करते. जेव्हा एखादा मेसेज पाठवणारा वापरकर्ता अ‍ॅनिमेटेड अवतार निवडतो, तेव्हा तो स्टिकर म्हणून सेंड होतो. प्राप्तकर्ता हा अ‍ॅनीमिटेड आयकॉन आपल्या आवडीच्या सेक्शनमध्ये स्टिकरच्या रूपात जोडू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp schedule group call feature rollout beta testers check features details tmb 01
Show comments