आपल्या यूजर्संना नवीन सुविधा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सतत अ‍ॅप अपग्रेड करत असते. आता व्हॉट्सअ‍ॅपवर फेसबुक सारखा कव्हर फोटो ठेवता येणार आहे. हे फिचर व्यवसाय खात्यांसाठी डिझाइन केले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व घडामोडींचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo ने अलीकडेच या फिचरची माहिती दिली आहे. “जेव्हा हे फिचर बीटा यूजर्ससाठी सक्षम केले जाईल, तेव्हा व्यवसाय प्रोफाइल सेटिंग्जमध्ये काही बदल केले जातील,” असं WABetaInfo ने सांगितले. WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सच्या बिझनेस अकाऊंटच्या सेटिंग्जमध्ये कॅमेरा बटण आणण्याची योजना आखत आहे. याद्वारे यूजर्स कव्हर फोटो निवडू शकतात किंवा नवीन फोटोवर क्लिक करून कव्हर फोटो तयार करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमच्या संपर्क सूचीतील एखादा यूजर्स तुमच्या व्यवसाय प्रोफाइलला भेट देईल तेव्हा त्यांना तुमच्या प्रोफाइल फोटोसह तुमचा नवीन कव्हर फोटो दिसेल. WhatsApp बिझनेस अकाउंट्सवर कव्हर फोटो सेट करण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे.

यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नवीन अपडेटमध्ये ‘कम्युनिटी’ अपडेट आणण्यावरही काम करत आहे. कम्युनिटी एक खासगी प्लॅटफॉर्म आहे, जिथे खासगी प्लॅटफॉर्मपेक्षा ग्रुप अ‍ॅडमिनला अधिक अधिकार असतील. व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी हे ग्रुप चॅटसारखे असेल आणि ग्रुप अ‍ॅडमिन्स समुदायातील इतर ग्रुपशी लिंक करू शकतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp soon allow users to set fb like cover photo rmt