Whats App Fake International Calls : जगभरातील कोट्यवधी युजर्सना एका क्लिकवरून संपर्कात ठेवणाऱ्या व्हॉट्सॲपवरून सध्या भलताच स्कॅम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावर व्हॉइस मिस कॉल येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक व्हॉट्सॲप युजर्सने याबाबती तक्रारी केल्या आहेत. संपूर्ण देशात ही समस्या वाढली असून याप्रकरणी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. यावरून आता व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्याने याप्रकरणी खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, “आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेफ्टी टूल देत आहोत. व्हॉट्सॲपवर ब्लॉक-रिपोर्टचाही पर्याय उपलब्ध आहे. या ॲपवरून होणाऱ्या अनैतिक कामांवर प्रतिबंध घालण्याचा आमचा कायम प्रयत्न असेल.परंतु, आता नवा स्कॅम आला आहे. यामध्ये एका क्रमाकांवर मिस कॉल दिला जातो. त्या नंबरवर लोकांना परत कॉल केला की त्यांच्यासोबत स्कॅम केला जातो. परंतु, या स्कॅमवर व्हॉट्सॲपने ५० टक्क्यांपर्यंत प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केला आहे.”

काही दिवसांपूर्वी याप्रकरणी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही मोठं विधान केलं होतं. फोनमध्य इनबिल्ट असलेल्या ॲप्सना काय काय ॲक्सेस करण्याची परवानगी मिळाली पाहिजे. युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेची जबाबादारी संबंधित कंपन्यांनी घ्यायला हवी.