व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून वापरकर्ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. आपले फोटो, व्हिडीओ आणि अन्य गोष्टी एकमेकांसह शेअर करू शकतात. कंपनी देखील iOS आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. तसेच कंपनी काही काळानंतर अनेक डिव्हाइसला सपोर्ट करणे देखील थांबवते. कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे की, जे फोन अँड्रॉइड OS 5.0 आणि त्यावरील चालत नसलेल्या स्मार्टफोन्सला २४ ऑक्टोबरपासून सपोर्ट देणे बंद करणार आहे. सर्वात जुने आणि सर्वात कमी वापरल्या जाणाऱ्या फोनमध्ये WhatsApp चा सपोर्ट मिळणे बंद होणार आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.

जर का तुमचा स्मार्टफोन OS 5.0 किंवा त्यावर चालत नसलेल्या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करणे आवश्यक आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट असण्यासाठी वापरकर्त्यांचे अँड्रॉइड स्मार्टफोन्स OS 4.1 आणि त्यापेक्षा वरील व्हर्जनवर चालणारे असणे आवश्यक आहे. तसेच iOS १२ आणि त्यापुढील व्हर्जनवर चालणारे आयफोन्स तसेच KaiOS 2.5.0 आणि त्यावरील व्हर्जनवर चालणारे फोन ज्यात जिओफोन आणि जिओफोन २ चा समावेश होतो. हे सर्व निकष पूर्ण असणाऱ्या डिव्हाइसमध्येच आता WhatsApp चा सपोर्ट मिळणार आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर

हेही वाचा : अ‍ॅपलच्या अधिकृत स्टोअर्ससह ‘या’ प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येणार iPhone 15; आकर्षक ऑफर्स एकदा पाहाच

तुमच्या स्मार्टफोनचे Android OS व्हर्जन कसे तपासायचे ?

तुमचा स्मार्टफोन हा कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमवर हे कसे तपासायचे जाणून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या फोनमधील सेटिंगमध्ये जायचे आहे. त्यानंतर अबाउट फोनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर इन्फॉर्मेशनमध्ये क्लिक करायचे आहे. तिथे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो हे तपासता येईल. जर का तुमचा फोन अँड्रॉइड ४.० किंवा त्याखालील ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत असेल तर त्या डिव्हाइसला ऑक्टोबरपासून WhatsApp सपोर्ट मिळणार नाही.

तुमच्या स्मार्टफोनचे iOS  व्हर्जन कसे तपासायचे?

iOS स्मार्टफोनमध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला जनरल सेटिंगमध्ये जावे लागेल त्यानंतर अबाउट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तिथे तुम्ही तुमचा स्मार्टफोन कोणत्या iOS सिस्टीमवर चालत हे पाहू शकता. कंपनी ज्या डिव्हाइसचा सपोर्ट बंद करणार आहे त्यांना डिव्हाइसवर कंपनी एक नोटिफिकेशन पाठवणार आहे. आता तुमच्या या ऑपरेटिंग सिस्टिमला WhatsApp चा सपोर्ट मिळणार नाही अशा प्रकारचे नोटिफिकेशन पाठवले जाणार आहे. तसेच तुम्हाला तुमचे डिव्हाइस अपग्रेड करण्याबाबत एक रिमायंडर देखील कंपनी पाठवणार आहे.

एचटीसी Onem, सोनी Xperia Z, एलजी Optimus G प्रो, सॅमसंग गॅलॅक्सी S2, सॅमसंग गॅलॅक्सी Nexus, एचटीसी Sensation, मोटोरोला Droid Razr,सोनी Xperia S2 आणि अन्य डिव्हाइसमध्ये WhatsApp चा सपोर्ट मिळणे बंद होणार आहे.