WhatsApp : हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी मेसेजद्वारे , व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्सद्वारे संवाद साधू शकतो. जगभरात कोणाशीही या प्लॅटफॉर्मद्वारे संवाद साधता येतो. हे प्लॅटफॉर्म मेटाच्या मालकीचे आहे. पण अनेकवेळा व्हाट्सअँपवर येणारे मेसेजेस , किंवा गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे स्टिकर्स , मिम्स यामुळे व्हाट्सअँपचे स्टोरेज फुल होते. हे स्टोरेज फुल झाले की ते डिव्हाइसचे स्टोरेज वापरते. यामुळे मोबाईल किंवा व्हाट्सअँप दोन्ही थोडे स्लो चालतात.
तुमच्या फोनमध्ये सेव्ह केल्ले व्हिडीओ आणि फोटो किंवा अन्य फाईल्स यांसारख्या मोठ्या फाईल्स डिलीट करून तुम्ही स्टोरेज मोकळे करू शकता. व्हाट्सअँपमध्ये एक इंटर्नल स्टोरेज आहे , ज्यामुळे तुम्ही किती स्टोरेज वापरत आहात हे तुम्ही शोधू शकता. आता आपण व्हाट्सअँप स्टोरेज कसे मोकळे करायचे ते जाणून घेऊयात.
हेही वाचा : Dangerous Apps: तुमच्या स्मार्टफोनमधून ‘हे’ २०३ अॅप्स डिलीट करा, नाहीतर…
Step-1. सर्वात पहिल्यांदा WhatsApp वर जाऊन चॅट्स टॅबवर क्लिक करा. नंतर मोअर ऑप्शनवर जाऊन सेटिंगमध्ये नेव्हीगेट करा.
Step-2. त्यानंतर स्टोरेज आणि डेटावर क्लिक करा आणि मॅनेज स्टोरेजवर क्लिक करा.
Step-3. आता वर तुम्हाला एकापेक्षा जास्त फॉरवर्ड केलेले मेसेज दिसतील. यानंतर तुम्हाला ५ एमबीपेक्षा मोठ्या फाईल्सचा ऑप्शन दिसेल.
Step-4. आता तुम्ही आवश्यक त्या सेक्शनमध्ये जाऊन एक-एक करून कोणतीही फाईल निवडू शकता व डिलीट करू शकता.
Step-5. डिलीट करण्यासाठी तुम्हाला हव्या असलेल्या फाईल्स निवडा. नंतर अॅपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये दिसणाऱ्या डिलीट आयकॉनवर क्लिक करा.
Step-6. तसेच याशिवाय तुम्ही सर्च फीचरचा वापर करूनसुद्धा या फाईल्स डिलीट करू शकता.