गेल्या काही महिन्यांपासून मेटा कंपनीने व्हॉट्सअॅपचे बरीच वेगवेगळी फीचर्स वापरकर्त्यांसाठी लाँच केली आहेत. त्यामध्ये व्हॉट्सअॅप वेबसाठी चॅट लॉक करणे हा एक नवीन अपडेट असून, इतरांच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रीनशॉट घेण्यावर बंदी, अशी वेगवेगळी फीचर्स कंपनीने वापरकर्त्यांसाठी लॉंच केली होती. त्यामुळे वापरकर्त्यांना सुरक्षित पद्धतीने अॅप वापरण्यास मदत होऊन, व्हॉट्सअॅप वापरण्याचा अनुभव सुधारण्याच्या दृष्टीने हे बदल केलेले आहेत, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता WABetaInfo नुसार, व्हॉट्सअॅपवरून लवकरच इतर अॅप्सवर मेसेज पाठविता येऊ शकतात, अशी माहिती मिळते. उदाहरणार्थ, तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या मदतीने टेलीग्राम किंवा सिग्नल यांसारख्या ॲप्सवर मेसेज पाठविता येऊ शकतो. परंतु, या फीचरला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही ॲप्सना अजून अधिकृत केले गेले नसल्याचेदेखील समजते.

हेही वाचा : WhatsApp ने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले भन्नाट फीचर! चुटकीसरशी शोधता येतील कोणतेही चॅट्स!

व्हॉट्सअपच्या या नवीन फीचरबद्दल अधिक माहिती पाहा

WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर किंवा अपडेट वापरकर्त्यांसाठी आणणार आहे. जे व्हर्जन २.२४.६.२ म्हणून ओळखले जाईल. हे फीचर थर्ड-पार्टी चॅट्स मॅनेज करण्यासाठी वापरले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

वेगवेगळ्या अॅप्लिकेशन्सवर कम्युनिकेशन वाढविण्यासाठी वापरकर्त्यासाठी चॅट इंटरऑपरेबिलिटीवर भर देणाऱ्या, डिजिटल मार्केट्स अॅक्ट (DMA)ला प्रतिसाद म्हणून व्हॉट्सअॅपने, याआधी अॅण्ड्रॉइड बीटा २.२४.५.१८ या व्हर्जनसाठी चॅट इंटरऑपरेबिलिटी फीचरवर काम करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच, गूगल प्ले स्टोरच्या २.२४.५.२० बीटा अपडेटच्या परीक्षणातून, व्हॉट्सअॅप हे सक्रियपणे थर्ड पार्टी चॅटसाठी, चॅट इन्फो स्क्रीन तयार करीत असल्याचेदेखील समजते. परंतु, व्हॉट्सअॅपद्वारे वापरकर्ते कोणत्या ॲप्सना मेसेज पाठवू शकतात यावर मात्र त्यांचे स्वतःचे नियंत्रण असेल, अशी माहितीदेखील इंडिया टुडेच्या लेखावरून समजते.

हेही वाचा : इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट न होऊ देता Threads प्रोफाइल कसे कराल बंद? या स्टेप्स पाहा….

मात्र, या फीचरमध्ये व्हॉट्सअॅपच्या थर्ड पार्टी चॅटमध्ये काही मर्यादा असतील. त्यानुसार थर्ड पार्टी ॲप्सचा समावेश असणाऱ्या ॲप्समध्ये ग्रुप चॅट किंवा समोरच्या व्यक्तीला फोन करणे शक्य होणार नाही. सुरुवातीला जरी या थर्ड-पार्टी फीचरमध्ये केवळ मेसेजचा पर्याय उपलब्ध असला तरीही भविष्यात यामध्ये अधिक गोष्टींचे अपडेट्स येऊ शकतात. इतकेच नाही, तर वापरकर्त्यांना ही इंटरऑपरेबिलिटी सेवा मॅन्युअली [स्वतःहून] सक्रिय [अॅक्टिव्हेट] करण्याचा पर्याय असेल, असे दिसते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp third party chat feature is it ready or not what is this new update is about find out dha