व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. कोणालाही पटकन संपर्क करायचा असेल तर व्हॉटसअ‍ॅप उत्तम पर्याय मानला जातो. मेसेजसह कॉल, व्हिडीओ कॉल, फोटो, व्हिडीओ शेअर करता येणे असे अनेक फीचर्स व्हॉटसअ‍ॅपवर उपलब्ध आहेत. आता सतत व्हॉटसअ‍ॅप पाहायचे जणू व्यसन लागले आहे. एखादे नोटीफिकेशन आले की लगेच काहीजण व्हॉटसअ‍ॅप उघडून त्यावर वेळ वाया घालवत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण व्हॉटसअ‍ॅप फॉरवर्ड मेसेज ही आता चिंतेची बाब होत चालली आहे. याबाबचे एक नवे फीचर लवकरच उपलब्ध होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हॉटसअ‍ॅपवर बऱ्याचदा हिंसा दाखवणारे, हिंसेला प्रोत्साहन देणारे, समाजात तेढ निर्माण करणारे फोटो, व्हिडीओ स्टेटसमध्ये शेअर केले जातात. अशा त्रासदायक कंटेन्टपासून सुटका मिळवण्याचा पर्याय आता उपलब्ध होणार आहे. व्हॉटसअ‍ॅप बीटा इन्फोने दिलेल्या माहितीनुसार व्हॉटसअ‍ॅपवर लवकरच स्टेटस रिपोर्ट करता येण्याचे फीचर उपलब्ध होणार आहे.

आणखी वाचा: १ जानेवारीपासून बदलणार Online Payment, Google Chrome सुविधा; जाणून घ्या मुख्य ३ बदल

हे फीचर वापरण्यासाठी स्टेटस मेन्युमध्ये पर्याय उपलब्ध असेल. या पर्यायाचा वापर करून कोणत्याही स्टेटस विरोधात युजर्स रिपोर्ट करून, ते व्हॉटसअ‍ॅपच्या नियमांविरुद्ध असल्याचे व्हॉटसअ‍ॅपला कळवू शकतात. या फीचरवर सध्या काम सुरू असल्याने, लवकरच हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होईल.