Whatsapp Online Payment Change : आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली असून तंत्रज्ञानासंबंधी काही गोष्टींमध्ये तुम्हाला बदल दिसून येईल. गुगल क्रोम, व्हॉट्सअ‍ॅप, ऑनलाइन पेमेंटसारख्या सेवांमध्ये आजपासून काही बदल करण्यात आले आहेत. कोणते आहेत हे बदल? जाणून घेऊया.

१) ४९ स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही

2022 साली युजरला गैरसोय होऊ नये आणि त्याचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने अनेक नवीन फीचर्स लाँच केलेत. हे फीचर्स युजर्समध्ये लोकप्रिय होत आहेत. मात्र, काही युजर्सना हे फीचर्सच काय तर व्हॉट्सअ‍ॅप देखील उपभोगता येणार नाही.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
Daily Horoscope 11 December 2024 in Marathi
११ डिसेंबर पंचांग: मोक्षदा एकादशीला धनूसह ‘या’ राशींना भगवान विष्णूसह लक्ष्मीही देईल आशीर्वाद; वाचा तुमचा बुधवार कसा जाणार?
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा

(Pen drive मध्ये पूर्ण स्टोअरेज का नाही मिळत? कमी का मिळते? जाणून घ्या त्यामागील रोचक कारण)

गिझचाइनानुसार, ३१ डिसेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपल, सॅमसंग आणि इतर अनेक ब्रँडमधील जवळपास ४९ स्मार्टफोन्सना आपले सपोर्ट बंद करणार आहे. याचा अर्थ ३१ डिसेंबर नंतर युजरला व्हॉट्सअ‍ॅपचा अपडेट जसे नवीन फीचर्स आणि सुरक्षेसंबंधी अपडेट्स मिळणार नाहीत.
३१ डिसेंबरनंतर या ४९ स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालवता येणार नाही.

Apple iPhone 5, Apple iPhone 5c, Archos 53 Platinum, Grand S Flex ZTE, Grand X Quad V987 ZTE, HTC Desire 500, Huawei Ascend D, Huawei Ascend D1, Huawei Ascend D2, Huawei Ascend G740, Huawei Ascend Mate, Huawei Ascend P1, Quad XL, Lenovo A820, LG Enact, LG Lucid 2, LG Optimus 4X HD, LG Optimus F3, LG Optimus F3Q, LG Optimus F5, LG Optimus F6, LG Optimus F7, LG Optimus L2 II, LG Optimus L3 II, LG Optimus L3 II Dual, LG Optimus L4 II, LG Optimus L4 II Dual.

(Save नसलेल्या नंबरवरही पाठवू शकता Whatsapp Message, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

LG Optimus L5, LG Optimus L5 Dual, LG Optimus L5 II, LG Optimus L7, LG Optimus L7 II, LG Optimus L7 II Dual, LG Optimus Nitro HD, Memo ZTE V956, Samsung Galaxy Ace 2, Samsung Galaxy Core, Samsung Galaxy S2, Samsung Galaxy S3 mini, Samsung Galaxy Trend II, Samsung Galaxy Trend Lite, Samsung Galaxy Xcover 2, Sony Xperia Arc S, Sony Xperia miro, Sony Xperia Neo L, Wiko Cink Five, Wiko Darknight ZT.

२) या लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम चालणार नाही

जर तुमच्या लॅपटॉप किंवा संगणकामध्ये विंडोज ७ आणि ८.१ वर्जन असेल तर तुम्हाला यात गुगल क्रोम वापरता येणार नाही. गुगल या वर्षी विंडोज ७ आणि ८.१ वर्जनसाठी क्रोम सपोर्ट बद करत आहे. सिस्टिममध्ये नवीन विंडोज टाकल्यास तुम्ही क्रोम वापरू शकाल.

(१० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Nothing Phone 1, कुठे मिळतोय? जाणून घ्या)

३) बंद होणार गुगलची ही सेवा

नवीन वर्षात गुगल तिची स्टाडिआ ही गेमिंग सेवा बंद करत आहे. ही क्लाऊड गेमिंग सेवा होती आणि तिला २०१९ वर्षी लाँच करण्यात आले होते. कमी लोकप्रियतेमुळे ही सेवा बंद केली जात असल्याचे म्हटल्या जाते. ही सेवा केवळ १८ जानेवारी २०२३ पर्यंत सुरू असेल.

४) ऑनलाइन पेमेंट

ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. पेमेंट करताना तुम्हाला थोडी आणखी मेहनत करावी लागेल, कारण १ जानेवारी २०२३ पासून गुगल कार्ड क्रमांक आणि एक्सपायरी डेटसारख्या कार्ड तपशीलांना सेव्ह करू शकणार नाही. याचा अर्थ तुम्हाला प्रत्येकवेळी ट्रान्झॅक्शन करताना कार्डची माहिती टाकावी लागेल. आरबीआयने सुरक्षित पेमेंटसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत आणि हे त्यापैकी एक आहे.

Story img Loader