आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. लोक त्यांचा बहुतांश वेळ स्मार्टफोनवर घालवाताना दिसतात. स्टॅटिस्टाने दिलेल्या माहितीनुसार, “यूएस मधील बहुतेक लोक त्यांचे स्मार्टफोन बदलण्यापूर्वी तो किमान दोन वर्षे आणि सात महिने वापरतात. काही लोक त्यांचे स्मार्टफोन बंद होईपर्यंत वापरतात. तुमच्याकडे जुना फोन असल्यास आणि तुम्ही सतत WhatsApp वापरत असल्यास, तुम्हाला ते ॲप वापरणे सुरू ठेवण्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.

CanalTech च्या अहवालानुसार, Apple, Huawei, Lenovo, LG, Motorola आणि Samsung सारख्या विक्रेत्यांच्या ३५ हून अधिक स्मार्टफोन्सवर आता WhatsApp अपडेट होणार नाही आणि ते बंद होईल.

Huawei आणि LG सारख्या ब्रँडने भारतात फोन विकणे बंद केले असताना, बरेच लोक अजूनही या ब्रँडचे फोन वापरत आहेत. तुम्ही देखील हे स्मार्टफोन्स वापरत असा आणि जर भविष्यात WhatsApp वापरण्यास इच्छूक असाल तर तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करावा लागेल. फक्त व्हॉट्सॲप नाही तर अनेक ॲप्सचे असेच धोरण आहेत. WhatsApp सारखे अॅपचे तीन अब्ज-अधिक वापरकर्ते आहेत हे लक्षात घेता अनेकांना आपला स्मार्टफोन बदलवा लागू शकतो.

सूचीमध्ये या दशकाच्या सुरुवातीच्या काही अत्यंत लोकप्रिय स्मार्टफोन्सचा समावेश आहे जसे की, Apple iPhone 6 आणि पहिल्या पिढीतील iPhone SE. त्याचप्रमाणे, Galaxy Note 3, Galaxy S3 Mini आणि Galaxy S4 Mini सारख्या लोकप्रिय सॅमसंग फोन वापरकर्त्यांना देखील WhatsApp चालू ठेवण्यासाठी नवीन मॉडेल्स खरेदी करावे लागणार आहे.

हेही वाचा – गूगलकडून एक कॉल आला अन्… अमेरिकन उद्योगपती मार्क क्यूबनचे जीमेल अकाउंट झाले हॅक; नेमकं घडलं तरी काय?

कालबाह्य हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे कारण

जुने स्मार्टफोनचे पार्ट्स आणि ऑपरेटिंग सिस्टिम यामुळे स्मार्टफोन विक्रेते त्यांचे फोन फक्त थोड्या काळासाठी अपडेट करतात. चांगल्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमुळे मेटासारखे ॲप डेव्हलपरचे ॲप्स नवीन ऑपरेटिंग सिस्टमसह चांगले काम करतात. WhatsApp वापरण्यासाठी, तुमच्या फोनमध्ये किमान Android 5 किंवा iOS 12 असणे आवश्यक आहे. तुमच्या फोनमध्ये जुनी ऑपरेटिंग सिस्टीम (Android 4 किंवा त्यापेक्षा जुनी) असल्यास, WhatsApp लवकरच त्यावर काम करणे थांबवू शकते.

‘या’ स्मार्टफोनवर व्हॉट्सॲप होणार बंद , येथे पाहा यादी

सॅमसंग
गॅलक्सी एस प्लस(X+), गॅलक्सी कोअर, गॅलक्सी एक्सप्रेसस टु गॅलक्सी ग्रँड, गॅलक्सी नोट थ्री(3), गॅलक्सी एस थ्री(S3) मिनी, गॅलक्सी एस-फोर(S4) मिनी, गॅलक्सी एसफोर झुम

मोटोरोला
मोटो जी(G), मोटो एक्स(x)

ॲपल
आयफोन फाइव्ह (5), आयफोन सिक्स (6), आयफोन सिक्स एस (6S), आयफोन एस-इ(SE)

ह्युवाई
असेंड पी सिक्स(6), असेंड जी फाईव्ह टु फाईव्ह(525), ह्युवाई सी वन नाईन नाईन (199), ह्युवाई जी एक्स १एस, ह्युवाई वाय सिक्स टु फाईव्ह(625)

लेनोवो
लेवोव्हो 46600, लेवोव्हो , लेवोव्हो 46600, लेवोव्हो A858T, लेवोव्हो P70, लेवोव्हो S890

सोनी
एक्सपेरिया झेड वन (Z1), एक्सपेरिया इ थ्री (E3)

एलजी
ऑप्टिमस फोर एक्स एच डी(4X HD), ऑप्टिमस जी(G), ऑप्टिमस जी प्रो( G Pro), ऑप्टिमस एल७

हेही वाचा – व्हॉट्सअ‍ॅपलाही लागणार आता स्नॅपचॅट फिल्टरचं वेड; सायबर गुन्हे रोखण्यासाठीही येईल कामी, कसा कराल नवीन फीचरचा उपयोग?

यापैकी एखादे डिव्हाइस तुमच्या मालकीचे असल्यास, व्हॉट्सॲपने काम करणे थांबवण्यापूर्वी नवीन स्मार्टफोन खरेदी करा कारण व्हॉट्सॲप बंद झाल्यावर जुन्या डिव्हाइसवरून नवीन डिव्हाइसवर डेटा ट्रान्स्फर करणे कठीण होईल. सुरक्षितपणे डेटा ट्रान्स्फर करण्यासाठी Google ड्राइव्हवर तुमच्या चॅट्सचा बॅकअप घ्या.