सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक, व्हॉट्सअ‍ॅपने वेळोवेळी अशी अनेक नवीन फीचर्स जारी केली आहेत ज्यामुळे वापरकर्त्यांसाठी चॅटिंग अधिक मनोरंजक आणि सोपे झाले आहे. या फीचर्सपैकी एक प्रमुख फीचर म्हणजे डिलीट मेसेज. मात्र, आज आपण अशी एक ट्रिक जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही हे डिलीट केलेले मेसेज वाचू शकता आणि समोरच्या व्यक्तीला कळणारही नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर वैयक्तिक किंवा ग्रुपमध्ये मेसेज करता तेव्हा तुमच्याकडे तो मेसेज डिलीट करण्याचाही पर्याय असतो. वापरकर्ता त्याचा संदेश स्वत:साठी किंवा सर्वांसाठी डिलीट करू शकतो, जेणेकरून तो संदेश समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही. मेसेज पाठवल्यानंतर काही काळासाठीच इतरांसाठी मेसेज डिलीट करण्याचा पर्याय शिल्लक राहतो.

युजर्सची सुरक्षा वाढवण्यासाठी Whatsapp ने उचलले महत्त्वाचे पाऊल; ‘हे’ नवे फीचर करणार मदत

या फीचरमुळे बऱ्याच गोष्टी नक्कीच सोप्या झाल्या आहेत, पण ज्याला मेसेज वाचायला मिळत नाही, त्याची खूप चिडचिड होते. हे मेसेज वाचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून कोणतीही ट्रिक समोर आलेली नाही. पण अनेक थर्ड-पार्टी अ‍ॅप्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही डिलीट केलेला मेसेजही वाचू शकाल आणि मेसेज डिलीट करणाऱ्याला हे कळणारही नाही.

आता तुम्ही विचार करत असाल की असे कोणते अ‍ॅप्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही डिलीट केलेले मेसेज पुन्हा डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता. तर अँड्रॉइड वापरकर्ते WAMR आणि WhatsRemoved+ सारखे थर्ड-पार्टी अ‍ॅप्स डाउनलोड करून दिलीत केलेले मेसेज किंवा मीडियामध्ये प्रवेश करू शकता. मात्र आयओएस युजर्ससाठी डिलीट केलेले मेसेज वाचण्याकरिता अद्याप कोणतेही थर्ड-पार्टी अ‍ॅप उपलब्ध नाही. पण थर्ड पार्टी अ‍ॅप्सऐवजी अ‍ॅपल यूजर्स त्यांच्या आयफोनच्या नोटिफिकेशन सेंटरमधून हे डिलीट केलेले मेसेज वाचू शकतात.

मेसेज सेंड झाल्यानंतरही करता येणार एडिट; जाणून घ्या WhatsApp चे नवे फीचर

हे सर्व थर्ड-पार्टी अ‍ॅप्स ते मेसेज डिलीट होण्यापूर्वी तुमच्या स्मार्टफोनमध्ये या मेसेजची कॉपी सेव्ह करतात. हे अ‍ॅप्स संदेशांसह फोटो, व्हिडिओ आणि लिंक्स देखील स्टोर करतात. हे अ‍ॅप्स तुम्हाला डिलीट केलेले मेसेज वाचण्याची परवानगी देतात परंतु ते पूर्ण सुरक्षिततेसह येत नाहीत, ज्यामुळे तुमच्या फोनमध्ये व्हायरस येऊ शकतात.