WhatsApp Upcoming Feature Can Add Music To Your Status : अगदी वैयक्तिक काम करायचो असो किंवा नोकरीच्या ठिकाणी एखादी मदत हवी असल्यास व्हॉट्सअॅपचे कोणते ना कोणते फीचर्स तुमच्या नेहमीच मदतीला येतात. कोणाला एखादी माहिती पटकन पोहोचवायची असेल तर मेसेज, व्हॉइज नोट, व्हिडीओ कॉल तर किंवा एखाद्याला रिज्युमे पाठवायचा असेल, तर डॉक्युमेंट फोल्डरवर क्लिक करून तुम्ही अगदी सहज पाठवू शकता. व्हॉट्सअॅप चुटकीसरशी सगळ्या युजर्सना मदत करतो.
यापूर्वी आपण इन्स्टाग्राम प्रमाणे व्हॉट्सअॅपलासुद्धा स्टोरी अपलोड करू शकत होतो. पण, इन्स्टाग्रामवर स्टोरी अपलोड करताना गाणे जोडण्याचीसुद्धा सोय होती. पण, आता हे तुम्ही व्हॉट्सअॅपमध्येसुद्धा करू शकणार आहात (WhatsApp Upcoming Feature).
नक्की कसे काम करणार हे फीचर चला जाणून घेऊ (WhatsApp Upcoming Feature)…
- तुम्ही तुमच्या फोटो आणि व्हिडीओला आवडते गाणे लावून स्टेटस ठेवू शकता.
- एक नवीन म्युझिक बटण ‘ड्रॉईंग एडिटर’ सेक्शनमध्ये अॅड केले जाईल.
- तुम्हाला फक्त त्या बटणवर टॅप करावे लागेल. टॅप केल्यानंतर युजर्स फोटो किंवा व्हिडीओसाठी त्यांच्या आवडीचे गाणे सहज निवडू शकतात.
- हे फीचर इन्स्टाग्रामच्या म्युझिक कॅटलॉगप्रमाणेच आहे. युजर्स ट्रॅक शोधण्याची, ट्रेंडिंग म्युझिक निवडू शकतात आणि शेअर करताना गाण्याचे निवडक कडवे किंवा गाण्याच्या ओळी निवडून अपलोड करू शकतात.
- हे फीचर सध्या बीटा युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे अद्याप याची चाचणी सुरू आहे. पण, असे असले तरीही लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी रोल आउट होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.
कसे काम करेल हे फीचर?
म्युझिक सिलेक्शन – युजर्स गाणी आणि ट्रेंडिंग ट्रॅकची लायब्ररी ब्राउझ करू शकतात.
कस्टमायजेशन – फोटो, व्हिडीओंसाठी तुम्ही १५ मिनिटांपर्यंतची क्लिप जोडू शकता.
इंटिग्रेशन – गाणी कन्टेंटसह synced केली जाऊ शकतात.
हे फीचर एक चांगला पर्याय आहे का?
हे फीचर युजर्सद्वारे शेअर करण्यात येणारे व्हॉट्सॲपचे क्षण सुधारण्यात मदत करेल. सुटीच्या दिवशी काढलेला स्नॅप असो किंवा सेलिब्रेशन व्हिडीओ तुम्ही त्यांना शोभणारे गाणे जोडू शकता. चाचणी झाल्यानंतर हे फीचर सगळ्यांसाठी रोल आउट केले जाईल आणि सगळ्यांच्या पसंतीससुद्धा उतरेल.