सोशल मीडिया हे मानवाच्या जीवनातील येऊ महत्वाचे साधन बनले आहे. सोशल मीडियाशिवाय आज माणूस राहूच शकत नाही. फेसबुक , इंस्टाग्राम ,व्हाट्सअँप यावर लोकं सक्रिय असतात. त्यापैकीच एक व्हाट्सअँपमध्ये आता एक नवीन बदल होण्याची शक्यता आहे. सध्या WhatsApp मध्ये आपल्याला काही महत्वाच्या व्यक्ती किंवा महत्वाच्या ग्रुप ना pin chat करून ठेवता येते. जेणेकरून त्यासाठी आपल्याला सारखे स्क्रोल करायला लागू नये. मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना तीन चॅट पिन करण्याची परवानगी आहे. मात्र WaBetaInfo नुसार तीनची मर्यादा पाचपर्यंत वाढवली जाऊ शकते. यामुळे WhatsApp युझर्स त्यांच्यासाठी महत्वाचे असणारे चॅट्सना प्राधान्य देऊ शकतील.
आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला नवीन व्यक्तींशी ओळख होते. त्यामुळे आणि अजून आपल्या कामामुळे दररोज चॅट्स ची संख्या ही वाढत असते. त्यामुळे अधिक chat pin करण्याचा पर्याय वापरकर्त्यांना फायदेशीर ठरू शकतो.
सध्या व्हाट्सअँपवर आपण तीन chat pin करू शकतो. social messaging app आणि desktop वर हे फिचर उपलब्ध आहे. मात्र जर तुम्हाला WhatsApp वर chat pin कसे करायचे असा प्रश्न पडला असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स नुसार तुम्ही ते करू शकता.
Step -1 तुमच्या डिव्हाइसवर WhatsApp उघडा.
Step 2- Apple iPhone वर, तुम्ही पिन करू इच्छित असलेल्या चॅटवर उजवीकडे स्वाइप करा.
Step 3- Android वर, तुम्हाला पिन करायचे असलेले चॅट टॅप करा आणि धरून ठेवा आणि pin chat निवडा.
Step 4 – डेस्क्सटॉपवर एक drop down arrow दिसेल. त्यावर क्लिक करा आणि तिथे तुम्हाला chat वाचायला मिळेल.
हेही वाचा : FLIPCART वर स्वस्त दरात मिळतोय GOOGLE चा ‘हा’ फोन
सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म अशा एक फिचरवर काम करत आहे ज्यामध्ये युझर्सना स्टेटस अपडेट्सची तक्रार करता येईल. WABetaInfo च्या अहवालानुसार, कथित फीचर वापरकर्त्यांना स्टेटस विभागात नवीन मेनूमध्ये स्टेटस अपडेटची तक्रार करून देईल. हे फिचर लवकरच WhatsApp डेस्कटॉप बीटा वर आणले जाणार आहे.