व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी मेटा आहे. तसेच मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत. सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअ‍ॅपसाठी एका नवीन फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना कोणतेही नाव प्रविष्ट न करता ग्रुप तयार करण्याची परवानगी देते. जेव्हा कधी तुम्ही घाईत असाल आणि ग्रुपला नाव देण्यासाठी वेळ नसेल तेव्हा हे फिचर कमी येईल असे झुकरबर्ग यांनी नुकत्याच एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हे स्पष्ट करते की हे फिचर वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे देखील संरक्षण करते. ग्रुपमध्ये असणाऱ्या प्रत्येक मेंबरला ग्रुपचे नाव वेगवेगळे दिसणार आहे. प्रत्येकाने आपल्या संपकरत असणाऱ्या व्यक्तीनेच नाव काय सेव्ह केले आहे त्या आधारावर ती नावे दिसणार आहेत. तुमचा संपर्क नसलेल्या ग्रुपमध्ये तुम्हाला जोडल्यास त्यांना फक्त तुमचा फोन नंबर दिसणार आहे.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
imdb rating what is internet movie database all tou need to know
What is IMDb :आयएमडीबी म्हणजे काय? यावरुन चित्रपट हिट की फ्लॉप, कलाकारांची लोकप्रियता कशी ठरते? जाणून घ्या…
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल

हेही वाचा : भारतात Realme 11 5G लॉन्च, १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मिळणार…., किंमत २० हजारांपेक्षा कमी

नाव न देता ग्रुप तयार करता येणारे फिचर लवकरच येत्या आठवड्यात प्रत्येकासाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने गेल्या कधी दिवसांमध्ये आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स आणली आहेत. ज्याच्या मदतीने वापरकर्ते प्लॅटफॉर्म वापरताना चांगला अनुभव घेऊ शकतात.

HD फोटोज फिचर

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेटकडे लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo च्या अहवालानुसार ‘HD फोटो ‘ हे फिचर आणले आहे. हे फिचर iOS आणि अँड्रॉइड या दोन्ही वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. याआधी फोटो पाठवताना त्याची साईझ किंवा क्वालिटी कंप्रेस होत असे. मात्र या फीचरच्या मदतीने तुम्ही पाठवलेले फोटो HD क्वालिटीमध्येच समोरच्याला दिसणार आहे. तसेच मेटा कंपनी देखील WhatsApp वर एचडी व्हिडीओ शेअरिंग फिचर आणण्यासाठी काम करत आहे.

इन्स्टंट व्हिडीओ मेसेज

WhatsApp ने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. जे वापरकर्त्यांना त्यांच्या चॅटमध्ये लहान आकाराचे व्हिडीओ मेसेज सेंड आणि रिसिव्ह करण्यास परवानगी देते. कंपनीने instant video हे फिचर लॉन्च केले आहे. हे इन्स्टंट व्हिडीओ मेसेज हे व्हॉइस मेसेजसारखेच असतात. व्हिडीओ मोडवर स्विच करण्यासाठी वापरकर्ते टेक्स्ट फिल्डच्या उजव्या बाजूला असलेल्या आयकॉनवर क्लिक करू शकतात. तसेच त्यानंतर ते ६० सेकंद इतक्या वेळेचा व्हिडीओ शेअर करू शकतात. वापरकर्ते व्हिडीओ लॉक करण्यासाठी आणि हॅन्ड्स फ्री रेकॉर्ड करण्यासाठी स्वाईप देखील करू शकतात. 

Story img Loader