WhatsApp Video Call Feature : इन्स्टंट मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲप आता आयुष्याचा एक महत्त्वापूर्ण भाग झाला आहे. कुटुंब, मित्रपरिवार असो की कार्यालयीन काम, प्रत्येक ठिकाणी व्हॉट्सॲपचा उपयोग केला जात आहे. युजर्सचा अनुभव आणखीन चांगला व्हावा यासाठी कंपनी ॲपमध्ये सोईस्कर बदल करीत असते. आताही कंपनी व्हिडीओ कॉलिंगसंबंधीचे एक नवीन फीचर (WhatsApp Video Call Feature) घेऊन आली आहे. त्यानुसार युजर्स व्हिडीओ कॉलदरम्यान लाईटची अनोखी सेटिंग करू शकणार आहेत. काय होणार आहेत बदल ते बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

व्हॉट्सॲपचा लो-लाइट मोड काय आहे?

नावाप्रमाणेच लो-लाइट मोडचा उद्देश कमी प्रकाशात कॉलदरम्यान व्हिडीओची गुणवत्ता वाढवणे, हा आहे. या फीचरची (WhatsApp Video Call Feature) चाचणी घेत असताना जाणवलं की, हे फीचर व्हिडीओ कॉलदरम्यान ब्राइटनेस सुधारेल, तुमचा चेहरा अधिक उजळ दिसेल आणि अंधारात व्हिडीओच्या स्पष्टतेमध्ये व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी टाळण्यास मदत करील. म्हणजेच तुम्ही अंधारात व्हिडीओ कॉलदरम्यान तुमच्या मित्र व कुटुंबातील सदस्यांना पाहू शकतात.

व्हॉट्सॲपवर लो-लाइट मोड एनेबल कसं करायचं?

१. व्हॉट्सॲप उघडा.
२. कोणत्या तरी व्यक्तीला व्हिडीओ कॉल करून पाहा.
३. तुमचा व्हिडीओ फीड (Feed) फूल स्क्रीन करा.
४. त्यानंतर लो-लाइट मोड सक्रिय करण्यासाठी वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या ‘बल्ब’ चिन्हावर टॅप करा.
५. फीचर डिसेबल करण्यासाठी फक्त बल्ब चिन्हावर पुन्हा टॅप करा.

हेही वाचा…Online vs Offline : सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? जरा थांबा! ऑनलाइन घ्यावा की ऑफलाइन त्यासाठी ही माहिती वाचा

वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर WhatsApp वरील लो-लाइट मोडबद्दलची महत्त्वाची माहिती :

ॲव्हेलिबिलिटी (Availability) : लो-लाइट मोड हे फीचर आयओएस व ॲण्ड्रॉईड व्हर्जन अशा दोन्हीवर उपलब्ध असेल.

विंडोज ॲप : विंडोज ॲपवर हे फीचर उपलब्ध नसेल. त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ कॉलवर बोलताना ब्राईटनेस ॲडजेस्ट करावा लागेल.

टेम्पररी ॲक्टिव्हेशन : लो-लाइट मोड प्रत्येक कॉलसाठी सुरू करावा लागतो. कारण- सध्या याला कायम सक्षम ठेवण्याचा पर्याय अद्याप दिलेला नाही.

या नवीन लो-लाइट मोडच्या साह्याने WhatsApp युजर्सना कमी प्रकाशातही आपल्या प्रियजनांशी व्हिडीओ कॉलवर बोलणं सोपे होणार आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही कमी प्रकाशात असलेल्या खोलीत असाल, तर हे उपयुक्त फीचर सक्रिय करायला विसरू नका; जेणेकरून तुम्हाला अधिक व्यवस्थित दिसणाऱ्या व्हिडीओ कॉलचा अनुभव मिळू शकेल.