WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. कंपनी वापरकर्त्यांसाठी थोड्या कालावधीच्या अंतराने नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. आतासुद्धा व्हॉट्सअॅपने ios आणि android च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनवर ‘व्हिडीओ मेसेज’ या फीचरचे टेस्टिंग सुरू केले आहे. व्हॉइस मेसेजसप्रमाणे वापरकर्त्यांना हे फिचर व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि पाठवणे हा क्विक शॉर्टकट देणार आहे. याच्या मदतीने तुमची चॅट करत असताना एका क्लीकवर व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवू शकता. या फीचरमध्ये वापरकर्ते लहान व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवू शकतात.
व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo ला व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन 23.12.0.71 आणि अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन 2.23.13.4 हे नवीन व्हिडीओ मेसेज फिचर दिसले. जे स्क्रीनच्या खालील बाजूस असलेल्या चॅट बारवर अटॅचमेंट बटणाच्या बाजूला आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
WABetaInfo या फीचर ट्रॅकरने शेअर केलेल्या माहितीनुसार, तुम्ही व्हॉट्सअॅप चॅट विंडोमध्ये मायक्रोफोन आयकॉनवर क्लिक करू शकता. हे तुम्हाला एक व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड करू देईल. ज्याची रेकॉर्डिंग मर्यादा ही ६० सेकंड इतकी असू अशक्ते. WABetaInfo वेबसाइटचे असे म्हणणे आहे की जर का वापरकर्त्याला व्हिडीओ मेसेज आला तर ते मोठे दिसण्यासाठी त्यावर वापरकर्ते सिंगल क्लिक करू शकतात. ऑडिओ बाय डिफॉल्ट म्यूट केला जातो तो अनम्यूट केला जाऊ शकता.
WhatsApp वर टेक्स्ट मेसेज, अटॅचमेंटसह व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलप्रमाणे नवीन व्हिडीओ मेसेज फीचरला एंड-टू-एंड एन्क्रिप्शन अंतर्गत ठेवण्यात आले आहे. हे मेसेज इतर कोणत्याही चॅटवर फॉरवर्ड केले जाऊ शकत नाही. तसेच वापरकर्ते केवळ स्वतःच्या फोनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेलेच व्हिडीओ मेसेज पाठवू शकतात. तथापि, व्हिडीओ मेसेज मिळणारा व्यक्ती कोणत्याही इतर चॅट ग्रुपसह व्हिडीओ मेसेज शेअर करण्यासाठी आपल्या स्क्रीनवरील कंटेंट रेकॉर्ड करू शकतात.
व्हॉट्सअॅपने लॉन्च केले ‘Channel’ हे भन्नाट फिचर
व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी ‘Channel Tool’ आणले आहे. या टूलचा वापर आता वापरकर्ते करू शकणार आहेत. व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी असलेल्या मेटाने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इंस्टाग्राममध्ये ही सेवा सुरू केली आहे. व्हॉट्सअॅपवरील हे टूल सध्या सिंगापूर आणि कोलंबिया या ठिकाणीच उपलब्ध करण्यात आले आहे. लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येण्याची शक्यता आहे. whatsapp ने लॉन्च केलेल्या ‘चॅनेल’ फीचरच्या मदतीने वापरकर्ते व्हॉट्सअॅपवर महत्वाचे अपडेट मिळवण्यासाठी खाजगीरित्या लोकांचे किंवा संस्थांचे सदस्यत्व घेऊ शकतात.