WhatsApp Web Update : मेटाच्या मालकीचे व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल, चॅट, स्टेटस आदी पर्यायांव्यतिरिक्त व्यवहार किंवा ऑफिसच्या कामांसाठीही उपयुक्त आहे. अनेक युजर ऑफिसच्या कामांसाठी लॅपटॉप, संगणक यांच्यावर व्हॉट्सअ‍ॅप वेबचा उपयोग करतात. पण, व्हॉट्सअ‍ॅपचे असे अनेक फिचर आहेत ज्यांचा उपयोग तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरताना करू शकत नाही. तर आता व्हॉट्सअ‍ॅप ही संधीसुद्धा युजर्सना देणार आहे आणि लवकरच काही फिचर आपण सगळेच व्हॉट्सअ‍ॅप वेबवर वापरू शकणार आहोत.

व्हॉट्सअ‍ॅप युजरनेम फिचर आणि डार्क मोड हे दोन नवीन फिचर वेब वापरकर्त्यांसाठी घेऊन येत आहे.

11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान

युजरनेम फिचर :

व्हॉट्सअ‍ॅप या दोन नवीन फिचरवर काम करते आहे. युजरनेम फिचरमुळे कॉन्टॅक्ट नंबरशिवाय व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एकमेकांना युजर अ‍ॅड करू शकणार आहेत. युजरनेम फिचर इन्स्टाग्रामसारखं असणार आहे ; जिथे प्रत्येक व्यक्तीचे नाव वेगळे असणार आहे. वापरकर्त्यांना त्यांचे फोन नंबर उघड न करता एकमेकांशी कनेक्ट होण्यास अनुमती देणार आहे. उदाहरणार्थ : एखादी कॅब तुम्ही बूक केली आणि कॅब ड्रायव्हरला तुम्हाला तुमचा वैयक्तिक नंबर शेअर करायचा नसेल, तर हा फिचर तुम्हाला मदत करेल.

हेही वाचा…Year Ender: २०२३ मध्ये ‘हे’ पाच Android ॲप्स ठरले लोकप्रिय; पाहा यादी…

व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी डार्क मोड फिचर :

WabeBetaInfo मधील अहवालात असे दिसून आले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप त्याच्या वेब वापरकर्त्यांसाठी डार्क मोड फिचरवर काम करत आहे, ज्यामुळे कमी प्रकाशात युजर्सच्या डोळ्यांवर पडणारा ताण कमी होईल. या व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वेब व्हर्जनच्या साइडबारमध्येही बदल करणार आहे. अनेकदा संगणक, लॅपटॉपवर सतत काम केल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो; त्यामुळे हे फिचर युजर्ससाठी खूपच उपयोगी असणार आहे.

या नवीन अपडेटची अधिकृतपणे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती देण्यात आलेली नाही. पण, व्हॉट्सअ‍ॅपच्या विकासावर लक्ष ठेवणाऱ्या WabeBetaInfo या वेबसाईटने ही माहिती शेअर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या या फिचरमुळे अ‍ॅप वापरणं अधिक सोयीस्कर होणार आहे.