व्हाट्सअॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. व्हॉइस कॉल्स, व्हिडीओ क्लास आणि असंख्य गोष्ट आपण यावरून करू शकतो. व्हाट्सअॅप आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स आणत असते. करोडो भारतीय व्हाट्सअॅपचा वापर करतात. असेच अजून एक फिचर वापरकर्त्यांसाठी व्हाट्सअॅप घेऊन येत आहे. या व्हाट्सअॅपच्या नवीन फिचर बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
या फीचरचा वापर सध्या बीटा वापरकर्ते करू शकतात. म्हणजेच तुम्ही व्हाट्सअॅपच्या मीडियामधून १०० फाईल्स सिलेक्ट करू शकणार आहात. यापूर्वी याची मर्यादा फक्त ३० इतकी होती. या फीचरमुळे वापरकर्त्यांना फाईल्स शेअर करणे अधिक सोपे होणार आहे.
हेही वाचा : ChatGPT बाबत Google Search चे प्रमुख प्रभाकर राघवन यांचे मोठे विधान; म्हणाले…
या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, चॅटमध्ये १०० मीडिया फाईल्स शेअर करण्याची क्षमता काही बीटा परीक्षकांसाठी टेस्टफ्लाइट अॅपमधीं iOS साठी WhatsApp बीटाचे नवीनतम अपडेट स्थापित केल्यानंतर उपलब्ध असणार आहे. येत्या काही दिवसांत ते अधिक लोकांपर्यंत पोचणार आहे. लवकरच हे फिचर सरावांसाठी उपल्बध होणार आहे. गेल्या आठवड्यात मेसेजिंग प्लॅटफॉर्म Android बीटा वर हे फिचर आणत आहे अशी बातमी आली होती.