WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. तसेच व्हाट्सअॅप आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स किंवा काही अपडेट लॉन्च करत असते. व्हाट्सअॅपवर सध्या २ अब्जापेक्षा जास्त लोक सक्रिय आहेत. या माध्यमातून लोकं एकमेकांशी २४ तास जोडलेले असतात. तसेच लोक चॅट करण्यासाठी Emoji आणि GIF चा देखील वापर करतात. व्हाट्सअॅप या संबंधितच एक नवीन अपडेट आपल्या वापरकर्त्यांना देणार आहे. तर हे अपडेट नक्की काय आहे ते जाणून घेउयात.
व्हाट्सअॅप लवकरच आपल्या वापरकर्त्यांना एक नवीन अपडेट देणार आहे. म्हणजेच व्हाट्सअॅप वापरकर्त्यांना नवीन २१ ईमोजीचे अपडेट देणार आहे. सध्या हे ईमोजी बीटा टेस्टर्सकडे लाईव्ह करण्यात आले आहेत. जे लवकरच सर्व सामान्य वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध होणार आहेत. हे नवीन इमोजीचे अपडेट हे १५.० या अपडेटचा एक भाग आहे. याबद्दलची माहिती wabetainfo वेबसाइटने शेअर केली आहे.
हेही वाचा : WhatsApp लवकरच लॉन्च करणार नवीन फीचर, एका वेळी पाठवता येणार तब्बल ‘इतके’ फोटोज
व्हाट्सअॅपद्वारे लाँच होणारे हे ईमोजी थर्ड पार्टी कीबोर्डवर आधीपासूनच होते. मात्र त्यानंतर वापरकर्ते या ईमोजी दुसऱ्या व्यक्तीला शेअर करू शकत नव्हते. अपडेटनंतर हे २१ नवीन ईमोजी तुमच्या ईमोजी लिस्टमध्ये देखील जोडले जाणार आहेत. यामधील थ्री हार्ट हे ईमोजी लोकांना मोठ्या प्रमाणात आवडू शकते.
व्हाट्सअॅप आणखी एका फीचरवर काम करत आहे. ज्याच्यामध्ये वापरकर्ते अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स म्यूट करू शकणार आहेत. तुम्हाला सेटिंगमध्ये हा ऑप्शन मिळेल. हे फिचर तुम्ही सुरु केल्यानंतर तुम्हाला जर का एखाद्या अनोळखी व्यक्तीने कॉल केल्यास तुमचा फोन सायलेंट होईल. तुम्ही कॉल लिस्टमध्ये जाऊन हा कॉल पाहू शकणार आहेत.