व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्ह्यू वन्स या सुविधेचा वापर करून व्हॉटसअ‍ॅपवर सुरक्षितरित्या संवाद साधता येणे शक्य झाले. या सुविधेचा वापर करून युजर्स खाजगी किंवा महत्त्वाचे फोटो, व्हिडीओ शेअर करू लागले. जे समोरच्या व्यक्तीने पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होतात. ते फोटो किंवा व्हिडीओ पाठवलेल्या व्यक्तीला किंवा कोणत्याही इतर व्यक्तीला एकदा पाहिल्यानंतर पाहता येत नाहीत. हीच सुविधा आता मेसेजसाठीही उपलब्ध होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘व्हॉटसअ‍ॅप बीटा इन्फो’ने दिलेल्या माहितीनुसार लवकरच व्हॉटसअ‍ॅप मेसेजसाठीही ‘व्ह्यू वन्स’ सुविधा उपलब्ध होणार आहे. याचा वापर करून मेसेज पाठवल्यानंतर तो समोरच्या व्यक्तीला फक्त एकदाच पाहता येईल, त्यानंतर तो उपलब्ध होणार नाही. जर तुम्ही स्नॅपचॅट वापरले असेल, तर हे त्याप्रमाणेच आहे. स्नॅपचॅटमध्ये चॅटमधून बाहेर पडल्यानंतर ते चॅट डिलिट होतात.

आणखी वाचा: युट्यूब व्हिडीओमध्ये सबटायटल्स कसे अ‍ॅड करायचे? जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स

यासाठी ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ हा पर्याय उपलब्ध असला तरी त्यामध्ये समोरच्या व्यक्तीने मेसेज पाहिला का हे सतत पाहावे लागते आणि त्यानंतरच तो मेसेज डिलीट करता येतो. ही प्रक्रिया अनेकांना किचकट वाटते. त्याऐवजी आता नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. चॅटसाठी उपलब्ध होणारी व्ह्यू वन्स सुविधेवर अजुन टेस्टिंग सुरू असल्याने, ही सुविधा सर्वांसाठी अजुनही उपलब्ध झालेली नाही. या सुविधेचा वापर करून युजर्सना खाजगी मेसेज सहज पाठवता येतील, ज्यामध्ये इतर कोणीही तो मेसेज, त्यामधील माहिती पाहू शकणार नाही. अ‍ॅड्रेस, पासवर्ड, नंबर किंवा इतर पिन तुम्ही याद्वारे पाठवू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp will soon have view once feature to text messages know more pns