WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे . यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. व्हिडीओ कॉल्स, व्हॉइस कॉल्स तसेच स्टेट्स पोस्ट करणे अशा प्रकारचे फीचर्स तुम्हाला यावर वापरायला मिळतात. WhatsApp आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. WhatsApp आपले कॉलिंग फिचर सुधारण्यासाठी सतत काम करत आहेत. काही महिन्यांपूर्वी कंपनीने कॉलिंगसाठी लिंक तयार करण्याचा पर्याय दिला होता. WhatsApp आता Schedule Group Calls या फीचरवर काम करत आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते एका ठराविक वेळेसाठी ग्रुप कॉल शेड्यूल करू शकणार आहेत.
WABetaInfo च्या माहितीनुसार WhatsApp कडून हे फिचर विकसित करण्यात येत आहे. हे फिचर अद्याप बीटा टेस्टर्ससाठी जारी करण्यात आलेले नाही आहे. या अहवालानुसार ग्रुपमधील इतर मेंबरना एकत्र कॉलिंग करणे शक्य होणार आहे. या नवीन फीचरमध्ये वापरकर्त्यांना मेनूमध्ये कॉल शेड्यूल करण्याचा पर्याय दिला जाईल.
याशिवाय वापरकर्ते ग्रुप कॉल सुरु करण्यासाठी वेळ ठरवू शकणार आहेत. तसेच त्या शेड्यूल् कॉलला नाव देखील देऊ शकतात. हे फिचर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल या दोन्हींसाठी काम करेल. तसेच कॉल सुरु झाला की, सर्व टीम मेंबरना सूचित केले जाईल ज्यामुळे ते या कॉल मध्ये सामील होऊ शकतील. लवकरच WhatsApp हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध करेल.