WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून वापरकर्ते एकमेकांशी संवाद साधू शकता. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक अपडेट्स आणि फीचर्स लॉन्च करत असते. कंपनीने स्पॅम पासून वाचण्यासाठी आणि वापरकर्त्यांना स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी अनेक नवीन फीचर्स सादर केले आहेत. जसे की, अनोळखी नंबरवरून येणारे कॉल सायलेंट करण्याचे फिचर. आता WABetaInfo च्या अलीकडच्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की कंपनी डेव्हलपर्स सध्या ‘safety tools’ फीचरवर काम करत आहे. जे वापरकर्त्यांना अनोळखी नंबरवरून मेसेज मिळाल्यावर सुरक्षित राहण्यास मदत करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा कधीही तुम्हाला अशा कोणत्या व्यक्तीकडून मेसेज येतो जो तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसतो. तसेच आधी तुम्ही त्याची संवाद साधलेला नसतो. तेव्हा एक नवीन ‘सेफ्टी टूल्स’ पॉप-अप दिसेल जे अनोळखी नंबरवरून मेसेज तुम्ही काय करू शकता हे स्पष्ट करेल. कॉन्टॅक्ट ब्लॉक करणे किंवा रिपोर्ट करण्याचा पर्याय देण्याव्यतिरिक्त, WhatsApp प्रोफाइल फोटो, फोन नंबर आणि देश कोड तपासून चॅटमध्ये सुरक्षित कसे राहायचे याबद्दल काही माहिती देते. याबबातचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : Amazon Great Freedom Festival sale 2023: ‘या’ आयफोनवर मिळणार भरघोस डिस्काउंट; इतर प्रॉडक्ट्सवरील ऑफर्स पहाच

अ‍ॅप डेव्हलपर्सनी एक नवीन फिचर पण विकसित केले आहे जे अनोळखी नंबरला तुम्ही त्यांचा मेसेज वाचला आहे की नाही या जाणून घेण्यापासून रोखते. कॉन्टॅक्टला तेव्हाच सूचित केले जाईल जेव्हा तुम्ही उत्तर देणे पर्याय निवडाल. सध्या, नवीन सेफ्टी टूल्स हे अँड्रॉइड 2.23.16.6 साठी WhatsApp बीटा वर उपलब्ध आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅप हे फिचर जास्तीत जास्त लोकांसाठी सादर करणार आहे. त्यामुळे ते तुमच्या डिव्हाइसवर उपलब्ध होण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

तासुद्धा मेटाच्या मालकीच्या WhatsApp ने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. जे वापरकर्त्यांना त्यांच्या चॅटमध्ये लहान आकाराचे व्हिडीओ मेसेज सेंड आणि रिसिव्ह करण्यास परवानगी देते. कंपनीने instant video हे फिचर लॉन्च केले आहे. हे इन्स्टंट व्हिडीओ मेसेज हे व्हॉइस मेसेजसारखेच असतात. व्हिडीओ मोडवर स्विच करण्यासाठी वापरकर्ते टेक्स्ट फिल्डच्या उजव्या बाजूला असलेल्या आयकॉनवर क्लिक करू शकतात. तसेच त्यानंतर ते ६० सेकंद इतक्या वेळेचा व्हिडीओ शेअर करू शकतात. वापरकर्ते व्हिडीओ लॉक करण्यासाठी आणि हॅन्ड्स फ्री रेकॉर्ड करण्यासाठी स्वाईप देखील करू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp work on safety tools to users secure for scammers and span calls check details tmb 01
Show comments