WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ज्यावरून आपण एकमेकांशी संवाद साधतो. व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटा आहे. व्हॉट्सअॅप सतत आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स आणत असते. व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मची सुरक्षा आणि वापरकर्त्यांशी मित्रता वाढवण्यासाठी अनेक नवीन फीचरवर काम करत आहे. मेटाच्या मालकीच्या लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅपने नुकतेच ‘सायलेन्स अननोन कॉलर’ आणि मेसेज एडिट करण्याचे फिचर लॉन्च केले आहे. सध्या व्हॉट्सअॅप Pinning Message या फीचरवर काम करत आहे.
WaBetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप ‘message pin duration’ या फीचरवर काम करत आहे. हे आगामी फिचर वापरकर्त्यांना चॅट्स आणि ग्रुप्समध्ये मेसेज पिन केले जाऊ शकतात. व्हॉट्सअॅपच्या आगामी काळामध्ये येणाऱ्या अपडेटमध्ये ते रिलीज होईल अशी अपेक्षा आहे. या फीचरवर सध्या काम सुरू आहे आणि WaBetaInfo द्वारे अँड्रॉइड 2.23.13.11अपडेटसाठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये ओळखले गेले आहे. जे गुगल प्ले स्टोअरवर असू शकते. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये मेसेज पिन कालावधी फिचर वापरकर्त्यांना चॅटमध्ये किती कालावधीसाठी मेसेज पिन केले आहे यासाठी परवानगी देईल. वापरकर्त्यांजवळ विशिष्ट कालावधी निवडण्याचा पर्याय असेल. त्यानंतर पिन केलेला मेसेज ऑटोमॅटिक अनपिन होईल. वरीलप्रमाणे WhatsApp वरील message pin duration या फीचरवर सध्या काम सुरु आहे. कंपनीने हे कधी रिलीज होईल याबद्दल काही सांगितलेले नाही. तथापि व्हॉट्सअॅपच्या भविष्यातील अपडेटमध्ये ते बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध करून दिले जाण्याची अपेक्षा आहे.
रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे, WhatsApp मधील मेसेज पिन कालावधी फिचर सुरुवातीला वापरकर्त्यांना पिन करण्यात आलेल्या मेसेजसाठी कालावधी निवडण्यासाठी तीन पर्याय देईल. २४ तास, ७ दिवस आणि ३० दिवस असे तीन पर्याय मिळणार आहेत. वापरकर्ते त्यांना हवा असलेला पर्याय त्यांच्या गरजेनुसार निवडू शकतात.