व्हॉट्सॲप एक सोशल मीडिआ प्लॅटफॉर्म; ज्यामुळे घरबसल्या एकमेकांना संदेश पाठवणं, लांबच्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधणं, घरबसल्या स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ आवडत्या व्यक्तीला पाठवणं, तसेच कामासंबंधित अनेक गोष्टी करणे शक्य होते. मेटाच्या मालकीचा असणारा व्हॉट्सॲप नेहमीच आपल्या युजर्सना नवनवीन फिचर्स, इंटरेस्टिंग अपडेट लाँच करून देत असतो. आतापर्यंत आपण सगळ्यांनी ग्रुप चॅट, ग्रुप व्हिडीओ कॉल, ग्रुप कॉलिंग अशा वेगवेगळ्या फिचर्सचा अनुभव घेतला. पण, आता सगळ्यांना “ग्रुप व्हॉईस चॅट” या नव्या फिचरचासुद्धा अनुभव घेता येणार आहे. मेटाने (Meta) “ग्रुप व्हॉईस चॅट “Voice Chat With Large Group” लाँच केला आहे. या फिचरमध्ये तुम्ही ग्रुपमधल्या सदस्यांशी लाईव्ह संवाद साधू शकता. तसेच या ग्रुप व्हॉईस चॅटमध्ये ३३ ते १२८ जण एकत्र संवाद साधू शकतात.

व्हाट्सॲपच्या (Whatsapp ) अधिकृत एक्स (ट्विटर) वर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. मेटा मालकीचे मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ ग्रुप संवादासाठी सोईस्कर ग्रुप व्हॉईस चॅट फिचर लाँच करण्यासाठी तयार आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलं आहे. ‘व्हॉईस मेसेज’ हा फिचर आधीपासून होताच, पण “ग्रुप व्हॉईस चॅट” फिचरचा अनुभव यापेक्षा थोडा वेगळा असणार आहे. यामध्ये तुम्ही एकापेक्षा अनेक लोकांशी आवाजाच्या मदतीने लाईव्ह संवाद साधू शकणार आहात.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

हेही वाचा…सावधगिरी बाळगा! व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे ‘हे’ मेसेज धोकादायक; चुकूनही क्लिक करू नका, अन्यथा…

ग्रुप वॉईज चॅट कसे सुरू कराल ?

१. ज्या ग्रुपबरोबर तुम्हाला “व्हॉईस चॅट” करायचे आहे, तो ग्रुप ओपन करा.
२. त्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक वेव आयकॉन (Wave Icon) दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करा.
३. मग “व्हॉईसचॅट” यावर क्लिक करा. त्यानंतर ग्रुप वॉईज चॅट सुरू होईल.
४. तसेच व्हॉईस चॅटमधून बाहेर पडण्यासाठी एक्सवर (X) क्लिक करा
यात ३२ किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य एकाच वेळी कनेक्ट होऊ शकतात. ग्रुप व्हॉईस चॅट फिचर प्रत्येक ग्रुपसाठी शक्य असणार आहे. या फिचरमुळे कोणालाही पर्सनल कॉल न करता एकाचवेळी तुम्ही अनेकांशी लाईव्ह संवाद साधू शकता, बोलू शकता.