Whatsapp Response After Elon Musk Tweet: ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क हे गेल्या काही महिन्यांपासून खूप चर्चेत आहेत. ब्लू टिक सबस्क्रीप्शनबाबतच्या निर्णयामुळे एलॉन मस्क यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली होती. तर काहीजणांनी त्यांच्या या कृतीला पाठिंबा देखील दिला होता. मस्क यांनी केलेल्या विधानांची सोशल मीडिया खूप चर्चा असते. त्यांचे ट्वीट्स प्रचंड व्हायरल होत असतात. तीन-चार दिवसांपूर्वी ट्विटरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने व्हाट्सअ‍ॅप संबंधित तक्रार करणारे ट्वीट शेअर केले होते. या ट्वीटवर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया देत एलॉन मस्क यांनी ट्वीट करत मेटा कंपनीला टोला लगावला. या एकूण प्रकरणावर व्हाट्सअ‍ॅपने अधिकृतरित्या भाष्य केले आहे.

फोद डबिरी (Foad Dabiri) हा ट्विटरमध्ये इंजिनियर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने व्हाट्सअ‍ॅपची तक्रार करत ट्वीट पोस्ट केले होते. या ट्वीटमध्ये त्याने “मी झोपेत असताना व्हाट्सअ‍ॅप बॅकग्राउंडमध्ये मायक्रोफोन सुरु होता. सकाळी ६ वाजल्यापासूनही हा प्रकार पुन्हा सुरु झाला आहे. हे काय सुरु आहे?” असे लिहिले होते.

WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
Fans and netizens reaction on tejashri Pradhan exit from premachi goshta serial
“खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”
Govinda And Shakti Kapoor
“असुरक्षितता माणसाला कुठून कुठे…”, शक्ती कपूर यांचे गोविंदा यांच्याबद्दल वक्तव्य, म्हणाले, “इतक्या वर्षांत…”
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
Image of Elon Musk, Chris Anderson, or a related graphic
Elon Musk : “तुमच्या पोस्ट्समुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो”, TED Talks च्या प्रमुखांनी एलॉन मस्क यांना फटकारले

आपल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे ट्वीट पाहून एलॉन मस्क यांनी व्हाट्सअ‍ॅपवर अप्रत्यक्षरित्या टिका करत “कोणावर विश्वास ठेवू नका, कोणावरही नाही.” असे ट्वीट केले.

यावर व्यक्त होताना केंद्रिय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘या घटनेमुळे गोपनीयतेचा भंग झाला आहे आणि त्याबाबत सरकार तातडीने तपास करणार आहे’ असे म्हटले. या एकूण प्रकरणावर व्हाट्सअ‍ॅपने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी

“मागील २४ तासांमध्ये ट्विटरमध्ये काम करणाऱ्या एका अभियंत्याने त्याचा Pixel फोन आणि WhatsApp संबंधित समस्येविषयी आमच्याशी संपर्क केला होता. Android मधील एका बगमुळे हा प्रकार घडला होता. हा बग गोपनीय माहितीबाबत चुकीची माहिती देतो आणि त्यामुळे गुगलला चौकशी करुन त्याबाबत उपाय करण्याचे आदेश देतो”, असे म्हटले. या समस्येवर उपाय करण्यासाठी काय करायला हवे याबाबतची माहिती देखील व्हाट्सअ‍ॅपद्वारे देण्यात आली.

गेल्या काही वर्षांमध्ये व्हाट्सअ‍ॅपचा डेटा चोरीला गेल्याच्या घटना वाढल्या होत्या. व्हाट्सअ‍ॅपने त्याची मूळ कंपनी मेटाला वापरकर्त्यांचे फोन नंबर, पत्ते यांसह अन्य खासगी माहिती पुरवले आहेत असे आरोप करण्यात आले होते.

Story img Loader