व्हॉट्सॲपने काही काळापूर्वी भारतात पेमेंट सेवा सुरू केली होती. तर आता मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप भारतातील पेमेंट सेवा पुढे नेण्यासाठी ग्राहकांना पहिल्या तीन व्यवहारांवर कॅशबॅक ऑफर करत आहे. व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना ३५ रुपयांपर्यंत आणि मनी ट्रान्सफरवर एकूण १०५ रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. या कॅशबॅकचा लाभ कसा घेता ते जाणून घेऊया. व्हॉट्सॲप ही ऑफर काही निवडक वापरकर्त्यांना देत आहे. वापरकर्ते त्यांच्या संपर्कांना १ रुपये देखील देऊ शकतात आणि त्यांना पण वैध व्यवहार म्हणून गणले जाईल. कंपनी आपल्या पेमेंट सेवेचा प्रचार करण्यासाठी एक नवीन व्हॉट्सॲप कॅशबॅक वैशिष्ट्य आणत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला १०५ रुपयांचा कॅशबॅक मिळेल

१. सर्वप्रथम, व्हॉट्सॲप पेमेंट सेट करा आणि तुमचे बँक खाते लिंक करा, जसे तुम्ही बँक खाते गुगल पे किंवा फोन पे शी लिंक करता.

२. लिंक केल्यानंतर पेमेंट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत ती व्यक्ती निवडा. हे ठरवल्यानंतर, किमान १ रुपये पेमेंट करण्यासाठी यूपीआय पिन प्रविष्ट करा.

३. पेमेंट केल्यानंतर लवकरच, तुम्हाला व्हॉट्सॲपवरून ३५ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तुम्हाला पहिल्या तीन पेमेंटवर एकूण १०५ रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

कॅशबॅक घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

ग्राहकांना कॅशबॅक मिळण्यासाठी काही नियमही ठरवण्यात आले आहेत. जेव्हा ते पात्र ग्राहकाला पैसे पाठवत असतील, तेव्हा त्यांना ॲपमध्ये प्रचारात्मक बॅनर किंवा भेट चिन्ह दिसले पाहिजे. वापरकर्ते किमान ३० दिवसांसाठी व्हॉट्सॲप वापरकर्ते असणे आवश्यक आहे, तर व्हॉट्सॲप व्यवसाय खाती या ऑफरसाठी पात्र नसतील. तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवत आहात ती व्यक्ती व्हॉट्सॲप वापरकर्ता असावी आणि त्याने भारतात व्हॉट्सॲप पेमेंटसाठी नोंदणी केली असावी. तसंच वापरकर्त्यांनी व्हॉट्सॲपच्या नवीन आवृत्तीवर अपडेट केले पाहिजे.

Story img Loader