भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून (TRAI) आता लवकरच एक महत्वाची सेवा सुरु केली जाणार आहे. त्याद्वारे तुमची अनोळखी मोबाईल नंबरपासून सुटका होणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक वेळा अनोळखी नंबरवरुन आलेले कॉल उचलण्याचा कंटाळा येतो.

तर काहीना अनोळखी नंबरची भीती देखील वाटते. मात्र, आता सरकारकडून एक अशी सुविधा अमंलात आणली जाणार आहे. त्यामुळे तुमची अनोळखी नंबरपासून सुटका होणार आहे. कारण, आता जो व्यक्ती तुम्हाला कॉल करेल त्याचं नाव मोबाईल फोनमध्ये सेव केलेलं नसले तरीही ते तुम्हाला दिसणार आहे.

Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
Commissioner Dr Indurani Jakhar instructed department heads to set office hours for listening to citizens complaints
नागरी समस्या, तक्रारी ऐकून घेण्यासाठी नागरिकांना वेळ द्या, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला दिली महत्त्वाची परवानगी!
Sukesh Chandrasekhar Letter to Nirmala Sitharaman
ठग सुकेश चंद्रशेखरचं अर्थमंत्री सीतारामण यांना पत्र; ७,६४० कोटी रुपयांचा कर भरण्याची तयारी
Ration Card
Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘ही’ सेवा झाली बंद; काय होणार परिणाम? वाचा!
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”

आणखी वाचा- WhatsApp चॅट्स टेक्स्ट फाईल्समध्ये कायमस्वरूपी सेव्ह करण्यासाठी वापरा ‘या’ स्टेप्स

या योजनेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी (KYC) फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.

आता मिळणार १०० टक्के खरी माहीती –

अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलमुळे अनेक लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यामुळे आता अनोळखी नंबरवरुन लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर काही प्रमाणाक आळा बसणार आहे. दरम्यान, सध्या देखील आपल्याला अनोळखी नंबर कोणाचा आहे हे पाहता येतं. त्यासाठी आपण Truecaller सारख्या अ‍ॅप्सचा वापर देखील करतो. मात्र Truecaller सारखी अ‍ॅप्स तुमच्या मोबाईलमधील डाटा विकण्याची शक्यता असते.

आणखी वाचा- तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्डची नोंद आहे? ‘या’ सोप्या स्टेप्स वापरून लगेच जाणून घ्या

शिवाय आजकाल ही अ‍ॅप्स तुमच्याकडून ते देत असलेल्या सेवेचे मुल्य देखील आकारतात. तर या अ‍ॅप्सद्वारे मिळणारी माहिती देखील पुर्णपणे खरी असेल असा दावा करता येत नाही. त्यामुळे आपली काही प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असतेच. मात्र, सध्या ट्रायद्वारे केवायसी आधारित जी सेवा सुरू करण्यात येणार आहे त्याद्वारे ग्राहकांना १०० टक्के अचूक माहिती मिळणार आहे.

Story img Loader