FIFA world cup 2022 Argentina vs France : फिफा वर्डकप २०२२ स्पर्धेचा शेवटा सामना आज (18 डिसेंबर) खेळला जाणार आहे. हा अंतिम सामना अर्जंटिना आणि फ्रांसमध्ये होणार असून तो करतारमधील लुसेल येथे खेळला जाणार आहे. या सामन्यावर जगातील अनेक फुटबॉल प्रेमींच्या नजरा खिळणार आहेत. हा अंतिम सामना तुम्ही लाइव्ह स्ट्रिमच्या माध्यमातून घर बसल्या पाहू शकता.
अर्जंटिना आणि फ्रांसमध्ये होणारा अंतिम सामना आज संध्याकाळी ८.३० ला सुरू होणार आहे. हा सामना भारतात पाहण्यासाठी काही पर्याय आहेत, त्यांच्याबाबत जाणून घेऊया.
१) जिओ सिनेमा अॅप
Jio cinema app च्या माध्यमातून तुम्ही मोबाईल, टॅबलेट, संगणक, स्मार्ट टीव्हीवर लाइव्ह फुटबॉल सामना बघू शकता. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. या माध्यमातून तुम्हाला ४ के पर्यंत स्ट्रिमिंग मिळते. यासह विविध भाषांमध्ये तुम्ही सामन्याची कॉमेंट्री ऐकू शकता.
२) टीव्ही/डीटीएच
युजर अंतिम सामना केबल किंवा डीटीएचच्या माध्यमातून एमटीव्ही एचडी, स्पोर्ट्स १८ १ आणि स्पोर्टस १८ खेल या चॅनल्सवर पाहू शकतात. ज्यांच्याकडे जिओ सिनेमा अॅपचा अॅक्सेस नाही ते वेब ब्राऊजरच्या माध्यमातून लॅपटॉप, टॅबलेट आणि इतर इंटरनेट चालत असलेल्या उपकरणांवर जिओ सिनेमा पाहू शकतात.
३) स्मार्ट डिव्हाइस
तुम्ही सर्वोत्तम रेझोल्युशनमध्ये अर्जंटिना विरुद्ध फ्रांस हा अंतिम सामना पाहण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ४ के स्मार्ट टीव्हीवर जिओ सिनेमा अॅप डाऊनलोड करा.
(ओप्पोने सादर केले २ हलके Foldable phones; फीचर्स पाहून सॅमसंगलाही धडकी भरेल)
४) व्हीआय युजर्स सामना कसा पाहणार?
व्हीआय युजर्स देखील FIFA world cup 2022 final match पाहू शकतात. यासाठी त्यांना व्हीआय अॅप किंवा व्हीआय मूव्हीज आणि टीव्ही अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्याचप्रमाणे, टाटा प्ले डीटीएच युजर्सना टाटा प्ले अॅप डाऊनलोड करून watch.tataplay.com द्वारे त्यांच्या स्मार्टफोन किंवा संगणकावर फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना पाहता येईल.