Apple Event September 2022: ज्या क्षणाची सर्व आतुरतेने वाट पाहत होते असा Apple कंपनीचा iPhone १४ , iPhone १४ Max, iPhone १४ Pro आणि iPhone १४ Pro Max लाँच आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. ७ सप्टेंबर बुधवारी आयफोनच्या नव्या सिरीजमधील सर्व उत्पादने लाँच केली जाणार आहेत. भारतीय वेळेनुसार Apple iPhone १४ सीरिजचा लॉन्च इव्हेंट रात्री १०.३० वाजता सुरू होईल. Apple च्या iPhone १४ सीरिजचा लॉन्च इव्हेंट कॅलिफोर्नियातील मुख्यालयात आयोजित केला जाणार असला तरी आपण तो घरबसल्या पाहू शकाल. आयफोन १४ मधून आपल्याला कोणते नवे फीचर पाहायला मिळतील तसेच या नव्या मॉडेलची किंमत किती असू शकते हे आता आपण बघणार आहोत तसेच हा लाँच सोहळा कुठे आणि कसा हा लाईव्ह पाहता येईल हे ही जाणून घेऊयात..

मीडियाच्या अहवालानुसार, iPhone १४ च्या किंमतीबाबत काही अंदाज बांधण्यात येत आहेत. iPhone 14 $७४९ (५९, ४४० रू), iPhone १४ Max किंमत $८४९ (६७, ३७६ रू), iPhone १४ Pro ची किंमत $१,०४९ (८३, २४८ रू) आणि iPhone 14 Pro Max ची किंमत $१,१९४ (९१, १८४ रू) इतकी असू शकते. (iPhone 14 हा iPhone 13 पेक्षा स्वस्त असण्याची शक्यता; Tech जगतात चर्चांना उधाण)

iphone १४ चे फिचर्स

आयफोन १४ च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले बेस मॉडेलमध्ये, iPhone १४ ला बॉक्स डिझाइनमध्ये सादर केले जाईल असा अंदाज आहे. ग्रेफाइट, सिल्व्हर, गोल्ड आणि पर्पल कलरमध्ये iPhone १४ Pro आणि iPhone १४ Pro Max लाँच होतील अशा चर्चा आहेत. डिझाईन फार काही बदलेलं नसलं तरी iPhone १४ च्या कॅमेरा आणि बॅटरीमध्ये मोठे बदल केलेले आहेत. प्रो मॉडेलमध्ये ४८ एमपी वाइड-एंगल कॅमेरासह १२ MP अल्ट्रावाईड आणि टेलिफोटो सेन्सर मिळण्याची अपेक्षा आहे.

iphone १४ लाँच इव्हेंट कुठे, कधी व कसा पाहाल?

iPhone लॉन्च इव्हेंटचे ऑनलाइन स्ट्रीमिंग Apple द्वारे करण्यात येते, आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबसह वेबसाइटवर आयफोन 14 लॉन्च इव्हेंट ऑनलाइन पाहता येईल.