Cheapest Recharge Plan : दरदिवशी वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशावर अधिक ताण पडत आहे. अशातच प्रत्येक टेलिकॉम कंपनीने रिचार्ज प्लॅन्सची किंमत वाढवली आहे. त्यामुळे अनलिमिटेड कॉलिंगसह डेटासुद्धा उपलब्ध होईल अशा स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात आपण असतो. अलीकडेच ट्रायच्या आदेशानुसार सर्व टेलिकॉम कंपन्यानी पुन्हा ३० दिवसांचे रिचार्ज प्लॅन लाँच केले. पण त्यातही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिओ, एअरटेल आणि वोडाफोन या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांचे अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा उपलब्ध होणारे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते आहेत जाणून घेऊया.

जिओ, वोडाफोन व एअरटेलचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
4 Ways to Find Your WiFi Password when You Forgot It
How To Find Wi-Fi Password: वाय-फायचा पासवर्ड विसरलात का? मग ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि मिळवा सेव्ह केलेला पासवर्ड

आणखी वाचा : पार्किंगमध्ये गाडी शोधण्यासाठी गूगल करणार मदत! काय आहे हे फीचर जाणून घ्या

जिओचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

  • स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या बाबतीत, जिओ सर्वात कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन ऑफर करते. जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन २६ रुपयांचा आहे.
  • या प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध असतो.
  • या रिचार्ज प्लॅनवर २ जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध होतो.
  • या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएस सुविधा उपलब्ध नाही.
  • तसेच ६२ रुपयांचा प्लॅन देखील २८ दिवसांसाठी उपलब्ध असतो.
  • या प्लॅनमध्ये ६ जीबी चा इंटरनेट डेटा मिळतो.
  • कॉलिंगसाठी जिओचा सर्वात स्वस्त ७१९ रुपयांचा आहे.
  • या प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज २जीबी डेटासह १०० एसएमएस ही सुविधा उपलब्ध आहे.

एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

  • एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ९९ रुपयांचा आहे.
  • या प्लॅनमध्ये ९९ रुपयांचा टॉकटाइम २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
  • तसेच, या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी एकुण २०० एमबी डेटा दिला जातो.
  • एअरटेलचा 3 महिन्यांसाठीचा स्वस्त रिचार्ज प्लॅन ४५५ रुपयांचा आहे.
  • या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि ६ जीबी डेटा मिळतो.
  • तसेच ९०० एसएमएस (८४ दिवसांसाठी) करण्याची सुविधा या प्लॅनवर उपलब्ध आहे.

OTT Free Subscription : असे मिळवा नेटफ्लिक्स व अ‍ॅमेझॉन प्राईमचे मोफत सबस्क्रीप्शन

वोडाफोन – आयडियाचे सर्वात स्वस्त प्लॅन

  • वोडाफोन – आयडियाचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ९८ रुपयांचा आहे.
  • या प्लॅनमध्ये १५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि २०० एमबी इंटरनेट डेटा उपलब्ध होतो.
  • मात्र या प्लॅनमध्ये एसएमएस सुविधा उपलब्ध नाही.
  • याव्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा नसलेला वोडाफोनचा ९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅनदेखील स्वस्त आहे.
  • या प्लॅनमध्ये तुम्हाला ९९ रुपयांचा टॉकटाइम आणि २८ दिवसांसाठी २०० एमबी इंटरनेट डेटा मिळतो.