आजकाल महागाईमुळे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत आहे. रिचार्ज प्लॅन देखील याला अपवाद नाहीत. रिचार्ज प्लॅनची किंमत दिवसेंदिवस वाढत असताना सर्वात स्वस्त आणि जास्त ऑफर असणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात आपण असतो. त्यातच एखादा कमी किंमतीचा आणि जास्त ऑफर्स असणारा रिचार्ज प्लॅन उपलब्ध असेल तर आपण पैसे वाचल्याबद्दल आनंदी होतो. जिओ, एअरटेल, आणि वोडाफोनचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स कोणते आहेत जाणून घ्या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
- जिओच्या सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत २६ रुपये आहे.
- यामध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- यासह जिओचा ६२ रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील स्वस्त रिचार्ज प्लॅनपैकी एक आहे.
- यामध्ये २८ दिवसांसाठी ६ जीबी डेटा उपलब्ध होतो.
एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
- एअरटेलचा सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन ९९ रुपयांचा आहे.
- यामध्ये ९९ रुपयांच्या टॉकटाइमसह २०० एमबी डेटा उपलब्ध होतो.
- हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
आणखी वाचा : Google Maps वरून तपासा हवेची गुणवत्ता; सोप्या स्टेप्स जाणून घ्या
वोडाफोनचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
- वोडाफोनचा सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन ९८ रुपयांचा आहे.
- यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह २०० एमबी डेटा उपलब्ध होतो.
- हा रिचार्ज प्लॅन १५ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
- बीएसएनएलच्या सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत ४९ रुपये आहे.
- यावर १०० मिनिटांची फ्री व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे.
- हा रिचार्ज प्लॅन २० दिवसांसाठी उपलब्ध होतो.
First published on: 28-10-2022 at 10:59 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which are the cheapest prepaid recharge plan of jio airtel vodafone see list pns