सॅमसंग कंपनीने अगदी काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सीच्या S२४ सीरिजचे लाँच केले आहे. या लाँचमधील Samsung Galaxy S24 Ultra हा फोन एक प्रायमरी मॉडेल ठरलेले आहे. त्यामुळे त्याची तुलना इतर सर्वोत्तम स्मार्टफोनसह केली जात आहे. त्यातील एक फोन म्हणजे iPhone 15 Pro Max. सॅमसंग आणि ऍपलचे हे दोन्ही प्रीमियम स्मार्टफोन असून याक्षणी सर्वोत्तम सुविधा वापरकर्त्यांना पुरवत आहेत.

त्यामुळे वापरकर्तेदेखील या दोघांची तुलना करत आहेत. आता दोन्हीपैकी कोणता स्मार्टफोन सर्व बाबतीत उजवा ठरतो आहे, याची माहिती आपल्याला इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते. त्यावरून कोणता स्मार्टफोन सर्वात भारी आहे ते पाहा.

247 best buses accidents reported in 3 years
तीन वर्षांत २४७ अपघात; ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या सर्वाधिक दुर्घटना
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स

हेही वाचा : Samsung Galaxy S24, S24 Ultra, S24+ कोणता स्मार्टफोन सर्वोत्तम? जाणून घ्या

Samsung Galaxy S24 Ultra आणि iPhone 15 Pro Max फरक

डिझाइन आणि डिस्प्ले
Samsung Galaxy S24 Ultra-

६.८ इंचाची AMOLED screen आणि १२०Hz रिफ्रेश रेट + २,६००nits ब्राईटनेस असणारी स्क्रीन बसवलेली आहे. त्यासह यामध्ये फ्लॅट पॅनल्स देण्यात आलेले आहेत. या फोनमध्ये IP68 रेटिंगचा धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करणारा रेझिस्टन्स आहे.

iPhone 15 Pro Max

यामध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले असून यामध्ये २,०००nits ब्राईटनेस वापरकर्त्याला मिळेल, तर यामध्येदेखील IP68 रेटिंगचा धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करणारा रेझिस्टन्स आहे.

किंमत

नवीन लाँच झालेल्या या सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोनची किंमत १,२९,९९९ इतकी आहे. तर iPhone 15 Pro Max हा भारतामध्ये १,५९,९०० रुपयांना उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S24 Ultra या फोनचा प्रोसेसर्स पॉवर्डबाय Snapdragon 8 Gen 3 आहे. तर iPhone 15 Pro Max मध्ये A17 Pro Bionic chip वर काम करतो. दोन्हीही अत्यंत उत्कृष्टरित्या काम करतात. दोन्ही स्मार्टफोनमध्ये खालच्या बाजूला स्पीकर असून, एका इयरपीसमध्ये स्टिरीओ इफेक्ट बसवण्यात आलेला आहे.

हेही वाचा : इन्स्टाग्रामचे Nudge फीचर घेईल मुलांच्या झोपेची काळजी; ते नेमके कसे काम करते घ्या जाणून…

सॅमसंगचा हा फोन १२GB रॅमसह येत असून, आयफोनमध्ये मात्र केवळ ८GB रॅम मिळतो. असे असले तरीही दोघांच्या काम करण्यावर फारसा परिणाम होत नाही. कारण दोन्ही मॉडेल्समध्ये २५६GB स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा

Samsung Galaxy S24 Ultra मध्ये क्वॉड लेन्स रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये, २००MP मुख्य सेन्सर, a १२-मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड सेन्सर, १० मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सर ३x ऑप्टिकल झूम बसवण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर यामध्ये ५० मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सर, ५x ऑप्टिकल झूम लेन्सदेखील लावण्यात आलेली आहे. यामधून तुम्हाला रात्रीच्या वेळीही स्पष्ट फोटो काढता येतील. यामध्ये असणाऱ्या AI मुळे स्थिरपणे फोटो आणि व्हिडीओ काढता येतील, असे कंपनीचे म्हणणे आहे.

iPhone 15 Pro Max मध्ये ट्रिपल लेन्स कॅमेरा आहे. त्यासह ४८MP मुख्य वाईड सेन्सर, १२ MP अल्ट्रावाईड सेन्सर आणि १२MP टेलिफोटो सेन्सर ५x ऑप्टिकल झूम बसवण्यात आले आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

सॅमसंगच्या या नव्या मॉडेलमध्ये ५,०००mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. त्या तुलनेत मात्र iPhone 15 Pro Max मागे पडतो आहे. कारण यामध्ये केवळ ४,४२२mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. सॅमसंगचा हा फोन ४५W इतक्या वेगाने चार्ज होऊ शकतो, तर आयफोन केवळ २५W चार्जिंग गतीने फोनला चार्ज करतो.

एकूण पाहायला गेलो तर Samsung Galaxy S24 Ultra हा किंमत, कॅमेरा आणि बॅटरी या गोष्टींमध्ये iPhone 15 Pro Max पेक्षा अधिक सरस ठरत आहे, असे दिसते.

Story img Loader