एखाद्याला तत्काळ पैसे पाठविणे, वीजबिल भरणे, सिलिंडर बुक करणे आदी अनेक गोष्टींसाठी वापरले जाणारे सर्वांत लोकप्रिय ॲप म्हणजे ‘गूगल पे’ (Google Pay). अगदी रिक्षात, भाजीविक्रेत्यांकडे ते मॉलमधील प्रत्येक दुकानामध्ये गूगल पे ॲपचा क्यूआर कोड बोर्ड लावलेला तुम्हाला दिसून येईल. अलीकडच्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर इतका वाढला आहे की, प्रत्येक जण लहान लहान व्यवहार करण्यासाठीही गूगल पे या ॲपचा वापर करताना दिसून येत आहे. त्यामुळे जरी आपण पाकीट घरी विसरलो तरी मोबाईलमध्ये गूगल पे ॲप असले तर कोणालाही चिंता करण्याची गरज भासत नाही. कारण- या ॲपमुळे तुम्ही कधीही, कुठेही व कोणत्याही वेळी झटपट व्यवहार करू शकता. पण, तुम्ही कधी विचार केला आहे की, हे ‘गूगल पे’ ॲप लाँच करण्याची मूळ कल्पना कोणाची असेल? हे ॲप भारतात कधी लाँच झाले असेल? तर आज आपण या लेखातून याविषयी अधिक जाणून घेणार आहोत.
स्टार्टअपची गोष्ट
स्टार्टअप टॉकी यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘गूगल पे’ ॲपची स्थापना २६ मे २०११ रोजी झाली. अगदी सुरुवातीला या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचे नाव बदलून ११ सप्टेंबर २०१५ रोजी ‘ॲण्ड्रॉइड पे’ ठेवण्यात आले. त्यानंतर २८ ऑगस्ट २०१८ रोजी ‘गूगल पे’ या नावाने लाँच होण्यापूर्वी हे ॲप ‘तेज’ (Tez) या नावानेसुद्धा लाँच करण्यात आले होते.
गूगलद्वारे विकसित करण्यात आलेली गूगल पे ही सेवा डिजिटल वॉलेट कम ऑनलाइन पेमेंट प्रणाली म्हणून काम करते. हे ॲप वापरकर्त्यांना ॲण्ड्रॉइड फोन, स्मार्टवॉच व टॅबलेटद्वारे ऑनलाइन पेमेंट, खरेदी, तर विविध बँकांद्वारे लोन काढण्यासाठीसुद्धा परवानगी देते. आयओएस (IOS) हे आणखी एक प्लॅटफॉर्म आहे; जे भारत आणि युनायटेड स्टेट्समध्ये काही अटींसह वापरकर्त्यांना गूगल पे वापरण्याची परवानगी देतो.
हेही वाचा…आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट विंडोजचे ठरले नवे बॉस; जाणून घ्या पवन दावुलुरीबद्दल
गूगल ॲपचा शोध कोणी लावला ?
गूगल पे ॲपचा शोध सुजित नारायणन आणि सुमित ग्वालानी (Sujith Narayanan and Sumit Gwalani ) यांनी लावला.
गूगल पे ॲपचे सह-संस्थापक सुजित नारायणन यांच्या म्हणण्यानुसार, ‘गूगल तेज’वर काम करताना त्यांना आणि त्यांच्या टीमला असे जाणवले की, ग्राहकाचा आर्थिक प्रवास डिजिटल पेमेंटच्या पलीकडे आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेता, भारतातील वापरकर्त्यांना पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी एक नवीन, जलद व कार्यक्षम मार्ग प्रदान करणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा या संस्थापक जोडीने ‘गूगल पे’ नावाने ॲप लाँच करण्याचा निर्णय घेतला; जे वापरकर्त्यांना हजारो वर्षांसाठी आर्थिक सेवा पुरवेल.
सुजित नारायणन –
सुजित नारायणन आणि सुमित ग्वालानी हे गूगल पेचे सहनिर्माते आहेत. सुजित हे अनुभवी पेमेंट्स एक्झिक्युटिव्ह आहेत आणि त्यांना वित्तीय सेवा क्षेत्रांचा अनुभव आहे. सुजित हे वाराणसी येथील कालिकत आणि महात्मा गांधी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सुजित यांनी सात वर्षानंतर संस्थेच्या राष्ट्रीय विक्री व्यवस्थापकीय पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गूगल कंपनीत प्रवेश करण्यापूर्वी ते रेलिगेअर मॅक्वेरी प्रायव्हेट वेल्थचे उपाध्यक्ष होते. त्यांनी मार्केटिंग आणि चॅनेल डेव्हलपमेंटमध्येही काम केले आहे.
सुमित ग्वालानी –
गूगल पेचे सह-संस्थापक सुजित नारायणन यांच्याबरोबर सुमित ग्वालानी यांची हे ॲप सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी गूगल तेजचे भारतातील कामकाज हाताळले. सुमित यांनी गूगल कंपनीमध्ये १२ वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले आहे. गूगल कंपनीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोलंबिया विद्यापीठ, सांता बार्बरा येथे ते संशोधन सहायक होते. सुमित ग्वालानी हे मुंबई विद्यापीठात कम्प्युटर इंजिनियरिंगचे विद्यार्थी होते. सांता बार्बरा या विद्यापीठातून त्यांनी संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यापूर्वी बी.टेक. पदवी पूर्ण केली.
गूगल पे – नाव, लोगो आणि टॅगलाइन
सुरुवातीला या ॲपचे नाव गूगल पे ( Google pay) असे होते आणि ॲपच्या लोगोची डिझाइन एका बाजूला गूगलचा (Google) ‘जी’ (G); तर दुसऱ्या बाजूला ‘पे’ (Pay), असे इंग्रजी मजकुरात लिहिण्यात आले होते. त्यानंतर काही वर्षांनी या ॲपचे नाव बदलून ‘जी पे’ (G Pay); तर लोगो बदलून ‘जी’ व ‘यू’ G आणि U इंटरलॉक करण्यात आला आहे. तसेच यामध्ये लाल, पिवळा, हिरवा व निळा हे रंग लोगोसाठी वापरण्यात आले आहेत. ‘मनी मेड सिंपल’ ही गूगल पेची टॅगलाईन आहे. म्हणजेच गूगल पे वापरकर्त्यांचा पैशांची देवाणघेवाण करण्याचा मार्ग अधिक सोपा करते.
‘गुगल पे’ची आव्हाने –
जगातील सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक असणाऱ्या गूगल कंपनीच्या पाठिंब्यामुळे गूगल पे ची सुरुवात करताना छोट्या-उद्योगजकांना आणि स्टार्टअप्सना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या समस्यांना या संस्थापक जोडीला तोंड द्यावे लागले नाही किंवा कोणत्याही साधनांची कमतरताही भासली नाही. अगदी कोणत्याही आव्हानांना सामोरे जावे लागले नसले तरी २०२० मध्ये गूगल पे च्या ॲपवरील तांत्रिक बिघाड हा काही काळासाठी ट्रेंडिंग विषय ठरला होता.
अनेक वापरकर्त्यांनी गूगल पे ॲपची तक्रार देखील नोंदवली होती. प्रकरण असे होते की, काही गूगल पे युजर्सची बँक खाती कोणतीही सूचना न देता गूगल पे वरून काढून टाकण्यात आली होती. या प्रकरणाच्या तक्रारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वारंवार पोस्ट केल्या जात होत्या. याप्रसंगी गूगल पे टीमने सुचवले की, ॲपवर बँक खाती लिंक करताना वापरकर्त्यांन बरोबर नकळत झालेली एखादी कृती असू शकते. गूगल पे टीमने यावर उपाय शोधून काढला आणि परिस्थिती पूर्ववत झाली.
‘गूगल पे’ ची कामगिरी –
१. गूगलच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गूगल पे ने भारतात पदार्पण केल्यापासून अवघ्या दोन वर्षांत ६७ मिलियन ऍक्टिव्ह युजर्स गाठले.
२. गूगल पे ने २०१९ मध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये ५९ टक्के योगदान दिले होते.
३. फोन पे नंतर गुगल पे हे दुसरे सर्वात लोकप्रिय युपीआय प्लॅटफॉर्म आहे.
अनेक वापरकर्त्यांकडे गूगल पे हे ॲप असते. पण ॲपवर बँक खाते कसे जोडायचे हे बहुतेक लोकांना माहीत नसते. तर गॅझेट हाऊसने ही प्रक्रिया कशी करायची ते अगदी टप्प्याटप्प्याने सांगितले आहे.
तुमचे बँक खाते गूगल पेवर कसे जोडायचे ?
- स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात प्रोफाइल आयकॉनवर टॅप करून, गूगल पे खात्याचा तपशील उघडा.
- तुमचे बँक खाते जोडण्यासाठी ‘पैसे पाठवा’वर टॅप करा.
- तुमच्या बँकेचे नाव शोधा आणि ओपन करा.
- तुमच्या बँक खात्याशी संबंधित तुमचे सिम कार्ड निवडा.
- तुमच्या बँक तपशिलांची पडताळणी करण्यासाठी गूगल पे तुमच्या निवडलेल्या सिम कार्डवरून एक समर्पित एसएमएस पाठवेल आणि व्यवहार करण्यासाठी ते प्राथमिक बँक खाते म्हणून सेट करील.
- तुम्ही गूगल पेमध्ये एकापेक्षा जास्त बँक खाती जोडू शकता आणि व्यवहार करण्यासाठी खाते स्विचसुद्धा करू शकता.
गूगल पे हे ॲप इतर ऑनलाइन पेमेंट ॲपच्या तुलनेत अधिक का वापरले जाते?
इकॉनॉमिक्स टाइम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार या ॲपमध्ये वापरकर्त्यांसाठी सोईस्कर अशी अनेक फीचर्स आहेत.
- व्यवहार झटपट होतात.
- पैसे थेट बँक खात्यात पाठविले आणि प्राप्त केले जाऊ शकतात.
- या ॲपद्वारे लहान वा मोठे सर्व व्यवहार करता येतात.
- गूगल पे ॲप आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
- ॲप वापरकर्त्यांना एकापेक्षा अधिक पेमेंट पर्यायदेखील प्रदान करते. याचा अर्थ वापरकर्ते त्यांच्या मोबाइल नंबरद्वारे किंवा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस (VPAs)द्वारे व्यवहार करू शकतात.
- वापरकर्त्यांचे सगळ्यात आवडते फीचर म्हणजे ‘स्क्रॅच कार्ड’ – गूगल पे विविध व्यवहारांवर आकर्षक कॅशबॅक आणि ऑफर प्रदान करते. हे कॅशबॅक थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतात.
गूगल पे च्या सर्व खास वैशिष्ट्यांमुळे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे गूगल पे हे लोकप्रिय ॲप आज प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये दिसू लागले आहे. तर आज आपण या लेखातून गूगल पेची सुरुवात कोणी केली आण ‘गूगल पे’शी संबंधित काही खास माहिती जाणून घेतली.