Who is Linda Yaccarino?: एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतलं आणि तेव्हापासून ते त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. आता एलॉन मस्क लवकरच ट्विटरचं सीईओ पद सोडणार आहेत. त्यांनी नव्या सीईओची घोषणाही केली आहे. आता हे ट्विटरचं सूत्र एका महिलेच्या हाती येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ट्विटरला लवकरच नवीन सीईओ मिळू शकतो. वृत्तानुसार, NBC युनिव्हर्सल (NBCU) च्या जाहिरात विभागाच्या प्रमुख लिंडा याकारिनो (Linda Yaccarino), ट्विटरच्या नवीन सीईओ बनण्यासाठी चर्चा करत आहेत. एलॉन मस्क यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांनी ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी शोधला आहे, अद्याप याबाबत मात्र कोणाचेही नाव घेतले नाही अथवा भाष्यही केले नाही. तरी लिंडा याकारिनो यांचा नाव आता पुढे येऊ लागला आहे, चला तर जाणून घेऊया लिंडा याकारिनो आहेत तरी कोण…?
Linda Yaccarino कोण आहेत?
लिंक्डइन प्रोफाइलनुसार, लिंडा याकारिनो २०११ पासून NBC युनिव्हर्सलमध्ये आहेत, सध्या अध्यक्ष, ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग आणि पार्टनरशिप म्हणून काम करत आहेत. याआधी त्यांनी कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागातही काम केले आहे.
लिंडा याकारिनो यांनी लिबरल आर्ट्स आणि टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे.
लिंडा याकारिनो यांनी टर्नर कंपनीत १९ वर्षे काम केले, जिथे त्यांनी कार्यकारी उपाध्यक्ष/सीओओ जाहिरात विक्री, विपणन आणि अधिग्रहण या पदावर काम केले.
(हे ही वाचा : एलॉन मस्क देणार ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा; नवीन सीईओ म्हणून महिलेची नियुक्ती, सहा आठवड्यात स्वीकारणार पदभार )
लिंडा याकारिनो यांनी घेतली एलॉन मस्कची मुलाखत
याकारिनोने गेल्या महिन्यात मियामी येथे एका जाहिरात परिषदेत मस्कची मुलाखत घेतली. कॉन्फरन्समध्ये, याकारिनो यांनी प्रेक्षकांना टाळ्या वाजवून मस्कचे स्वागत करण्यास प्रोत्साहित केले आणि त्यांच्या कामाच्या नैतिकतेचे कौतुक केले.
ट्विटरचे सीईओ बनण्याची इच्छा केली व्यक्त
बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, याकारिनो तिच्या मित्रांना सांगत आहे की तिला ट्विटरचं सीईओ व्हायचे आहे. ती मस्कची समर्थक आहे आणि म्हणते की अब्जाधीशांनी कंपनीला वेळ देणे आवश्यक आहे.