Apple च्या iPhone 16 मालिकेची आज घोषणा करण्यात आली आहे. नव्या iPhone 16 मध्ये बाजूला कॅमेरा कंट्रोल बटण देण्यात आले आहे; ज्यामुळे तुम्ही डिजिटल कॅमेऱ्याप्रमाणे फोटो क्लिक करू शकता. हे नवीन कॅमेरा कंट्रोल बटण इतर अनेक स्मार्टफोन्समधील बटणांप्रमाणे फक्त फोटो काढणारे साधे बटण आहे, असे समजू नका. कारण- ते अधिक प्रगत आहे आणि त्यात फोटो काढण्यापलीकडे अधिक फीचर्स आणि अधिक क्षमता आहे. हे बटन अत्यंत प्रगत AI सिस्टीमशी जोडलेले आहे आणि जेव्हा तुम्ही बटण दाबता तेव्हा ते ही AI प्रणाली सक्रिय करते आणि सर्वोत्कृष्ट हार्डवेअर इंटिग्रेशन म्हणून काम करते. हार्डवेअर इंटिग्रेशन म्हणजेच फोनचे हार्डवेअर (प्रोसेसर, मेमरी व सेन्सर) हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सॉफ्टवेअरसह काम करण्यासाठी विशेषत्वाने डिझाइन केलेले आणि ऑप्टिमाइझ केलेले असते. Apple याला व्हिज्युअल इंटेलिजेन्स म्हणतो. व्हिज्युअल इंटेलिजेन्स फीचरला अॅपलच्या प्रगत AI तंत्रज्ञानाद्वारे सक्रिय करतो; ज्याला Apple Intelligence म्हणतात, त्यामध्ये जनरेटिव्ह AI (GenAI) क्षमतांचा समावेश आहे. नवीन ऑपरेटिंग सिस्टीम, iOS 18 असलेल्या iPhones वर उपलब्ध असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Apple Intelligence कसा करू शकता वापर
Apple Intelligence द्वारे समर्थित iPhone आता तुमचे प्रश्न पाहून, उत्तरे देण्यासाठी या कॅमेऱ्याचा वापर करू शकतो किंवा तुम्ही कुठे आहात, काय करीत आहात (खरेदी, प्रवास) यानुसार पुढे काय करू शकता याबाबत सूचना देतो. iPhone 16 Pro चा एक रंजक वापर म्हणजे एखाद्या फोटोग्राफरप्रमाणे चांगले फोटो काढण्यासाठी शॉट कसा फ्रेम करावा, सर्वोत्तम फोटोसाठी कोणती सेटिंग्ज वापरायची अशा सूचनाही देतो.
स्मार्टफोन्समध्ये AIचा वापर इतका उशिरा का सुरू झाला याबाबत माहिती देताना काउंटर पॉईंट रिसर्चचे पार्टनर व रिसर्च व्हीपी नील शाह यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “Apple AI विशेष आहे. कारण- ते चांगले हॉर्डवेअर (silicon), स्मार्ट सॉफ्टवेअर (software) व उपयुक्त सेवा (services) या तिन्ही गोष्टींचा मिलाफ साधून तयार करण्यात आले आहे. Apple तुमचा डेटा सुरक्षित आणि खासगी ठेवते. कारण- कंपनीची AI सेवा तुमच्या डिव्हाइसवरच काम करते (on-device AI ) आणि तुमचा डेटा बाह्य सर्व्हरवर (private Computing) पाठवत नाही किंवा तो ऑनलाइन संग्रहितही करीत नाही.
शक्तीशाली प्रोसेसर
Apple च्या नवीन iPhones मध्ये शक्तिशाली प्रोसेसर आहेत; जे प्रगत AI क्षमता सक्षम करतात. त्यामध्ये iPhone 16 हा उच्च कार्यक्षमता संगणकासाठी A18 प्रोसेसरसह उपलब्ध आहे आणि iPhone 16 Pro हा A18 Pro चिपसह उपलब्ध आहे; जो A18 पेक्षाही वेगवान व अधिक कार्यक्षम आहे. A18 या प्रोसेसरमध्ये वेगवान CPUs (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स) आहे, जे हाय-एण्ड डेस्कटॉप पीसीला टक्कर देते आणि त्याचबरोबर प्रगत GPU (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) आर्किटेक्चर आहे.
iPhone 16 Proमध्ये A18 Pro chip मुळे अधिक वेगवान आणि अधिक कार्यक्षम A18 प्रोसेसर मिळते, जे अनेक हटके फीचर्स वापरण्यास मदत करते. A17 Pro प्रोसररने समर्थित iPhone 15च्या तुलनेत A18 हे जनरेटिव्ह एआय वर्कलोडसाठी उत्कृष्टरीत्या ऑप्टिमाइझ केलेले न्यूरल इंजिन आहे. iPhone16 pro मधील A18 प्रो चिप विशेषरूपाने शक्तिशाली आहे. कारण- त्यात चांगल्या कामगिरीसाठी मेमरी बॅण्डविड्थ वाढवण्यात आली आहे आणि ऑप्टिमाइझ केलेल्या AI प्रक्रियेसाठी Apple Intelligence देखील वाढवली गेली आहे.
ग्राहकांची गोपनीयता आणि नियंत्रणास प्राधान्य
परंतु, अॅपलला माहीत आहे की, सर्व GenAI क्वेरी डिव्हाइसवर केल्या जाऊ शकत नाहीत आणि खासगी क्लाउड कॉम्प्युटची संकल्पना (Private Cloud Compute) आणली आहे, जिथे काही AI कार्ये आयफोनवरच केली जातात (on-device AI) आणि इतर कार्ये Apple च्या समर्पित सर्व्हरवर (Private Cloud Compute) केली जातात. ही अद्वितीय बाब आहे. तुमचा डेटा क्लाउडवर पाठवला जात नाही किंवा ऑनलाइन संग्रहित केला जात नाही आणि तुमच्या डेटावर तुमचे पूर्ण नियंत्रण असते. हा दृष्टिकोन ग्राहकांची गोपनीयता आणि नियंत्रणास प्राधान्य देतो.
वापरकर्त्यांसाठी याचा अर्थ कॅमेऱ्याद्वारे समर्थित व्हिज्युअल इंटेलिजेन्ससह संपूर्ण डिव्हाइसवरील प्रॉम्प्टमधून लेखन साह्य किंवा इमोजी आणि प्रतिमा मिळविण्याची क्षमता या बाबी Apple Intelligence द्वारे वापरकर्ता स्तरावर वैयक्तिकृत केल्या जातात आणि तुम्ही जे काही कराल त्यात हा संदर्भ असेल. तुमच्या मुलांची किंवा कुटुंबाची नावे, तुमचा प्राधान्यक्रम आणि स्थाने लक्षात ठेवा, जेव्हा Apple AI ही सेवा काहीतरी तुम्हाला सुचवेल.
AIचा असाही करू शकता वापर
AI ही सेवा तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर लेखनासाठी साह्य (आशय लिहिणे, व्याकरण सुधारणा) करते आणि तुमच्या सूचनांवर आधारित फोटो व इमोजी सुचवते, तसेच कॅमेऱ्याद्वारे समर्थित व्हिज्युअल इंटेलिजेन्सचा वापर करते.
अॅपल इंटेलिजन्स तुमचे वैयक्तिक तपशील (उदा. कुटुंबातील सदस्यांची नावे, मुले), तुमचे प्राधान्यक्रम (उदा. आवडते पदार्थ, संगीत), वारंवार भेट दिलेली ठिकाणे यांबाबत जाणून घेते आणि लक्षात ठेवते. ही वैयक्तिकृत माहिती तुम्हाला अधिक अचूक आणि संबंधित सूचना देण्यासाठी वापरता येते. थोडक्यात सांगायचे, तर तुमचे डिव्हाइस तुमच्या अन्य गरजा आणि प्राधान्यांनुसार तुम्हाला वैयक्तिक सहायकाप्रमाणे मदत करेल.
सिरीबरोबर संवाद साधण्याची क्षमता वाढली
सिरी (Siri) ही Apple ची मागील दशकातील जुनी हुशारीने काम करणारी वैयक्तिक सहायक सेवा आहे; ज्या सेवेला Apple Intelligence मुळे नव्याने जणू पुनर्जीवन लाखो अॅपल वापरकर्त्यांना दिवसभरात विविध बाबींसाठी साह्य म्हणून ‘सिरी’ला त्रास देण्याची सवय आहे. “Siri 2.0 सह अॅपलने स्वतः विकसित आणि लाँच केलेल्या ॲप्समध्ये वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन अधिक चांगला संवाद साधण्याची क्षमता आहे आणि इतर कंपन्यांनी तयार केलेली अॅप्सही तुमच्या डिव्हाइसवर संग्रहित वैयक्तिक Intelligence आणि डेटावर वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु, ऍपल वापरकर्त्यांना या डेटावर नियंत्रण करण्याची परवानगी देते. परंतु, अॅपल वापरकर्ते त्यांच्या डेटावर नियंत्रण ठेवू शकतात आणि ते इतर कंपन्यांसह किती डेटा शेअर करायचा हे ठरवू शकतात.
ॲपलला आपले ध्येय साध्य करण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. परंतु, या क्षेत्रातील स्पर्धा पाहता, ॲपलने वापरकर्त्यांना डेटावर नियंत्रण ठेवता येण्याबाबतचा दृष्टिकोन अधिक विकसित केलेला दिसतो. मुख्यत्वे Apple चे व्यावसायिकांना उपयुक्त ठरू शकेल असे वाणिज्यिक मॉडेल) वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळावा यावर (user experience) लक्ष केंद्रित करते.