Why is Apple phone’s display showing 9.41 time: अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अ‍ॅपलनं (Apple) आपली नवीन iPhone सीरीज 15 लाँच केली आहे. या iPhone सीरिजमध्ये चार मॉडेल्सचा समावेश आहे. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone Pro Plus. वापरकर्ते हे १५ सप्टेंबरपासून प्री-बुक करू शकतात आणि २२ सप्टेंबरपासून बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होईल. Apple ने फोन लाँच केल्यानंतर आता iPhone-15 चे नवीन फीचर्स आणि त्याची किंमत सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेक लोक फोनचे फोटोही शेअर करत आहेत, ज्याद्वारे त्याच्या लूकची प्रशंसा केली जात आहे. तुम्हीही नवीन आयफोनचे फोटो पाहिले असतील, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का, सोशल मिडीयावर शेअर होत असलेल्या आयफोनच्या सर्व फोटोंमध्ये सकाळी ९:४१ ची वेळ का दिसत आहे.

हे फक्त iPhone-15 बद्दल नाही, याआधीही लाँच झालेल्या सर्व iPhones मध्ये वेळ फक्त ९.४१ मिनिटे आहे. तुम्ही गुगलवर आयफोनचा फोटोही सर्च केलात तर प्रत्येक फोनची वेळ ९ वाजून ४१ मिनिटंच असते. पण अशी सारखी वेळ Apple ने आपल्या सर्व फोनवर का दिली आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का…? चला तर आज आपण या वेळेमागचं खरं गुपित काय आहे? जाणून घेऊया…

Mona Singh Lost 15 Kgs Weight
‘मुंज्या’तील पम्मी म्हणजे मोना सिंगने १५ किलो वजन कमी वेळात घटवलं! वजन कमी करताना व्यायाम व झोप किती असावी? डॉक्टरांकडून ऐका
Flood Bridge Collapse Viral Video Suddenly Death In Just 2 Seconds
‘आयुष्यात एका सेकंदाचं महत्त्व काय?’ एका पावलाच्या अंतरावर होत्याचं नव्हतं झालं; ‘हा’ VIDEO बघून उडेल झोप
Shevgyachi Chutney Recipe & Benefits:
५ मिनिटांत बनवा शेवग्याच्या पानांची ठेचा चटणी, डॉक्टरांनी सांगितलं डोळे, त्वचा व वजन नियंत्रणासाठी कशी होईल मदत?
Car bike tyre safety tips for monsoon
Monsoon Bike Riding: मान्सूनमध्ये लाँग ड्राईव्हला जाताय? मग आधी ‘हे’ वाचाच; प्रवास होईल सुखकर
Chana Jor Garam Bhel perfect recipe for evening
‘चना जोर गरम भेळ’ संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट रेसिपी; नोट करा साहित्य आणि कृती
carlos alcaraz admits the challenge of retaining his wimbledon title
विम्बल्डन विजेतेपद राखण्याचे आव्हान – अल्कराझ
Red Cheery tiny powerhouse of nutritional benefits best consumed Ten To Fifteen in a bunch help combat numerous diseases
लाल चेरी मधुमेहासह ‘या’ तीन समस्यांवर ठरेल रामबाण उपाय; किती व कधी खाल्ली पाहिजेत? पोषणतज्ज्ञांकडून जाणून घ्या
drinking milk
दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात, तुम्हालाही असे वाटते का? मग समज चुकीचा असू शकतो, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

iPhoneच्या फोटोमध्ये नेहमी ९ वाजून ४१ मिनिटंच वेळ का दाखवतात? 

अॅपलच्या वेबसाइटवर पाहिल्यास प्रत्येक फोनमध्ये वेळ सारखीच असेल. ही मालिका १६ वर्षांपासून सुरू आहे आणि ती २००७ मध्ये सुरू झाली. ज्यावेळी पहिला iPhone लाँच झाला तेव्हा स्टीव्ह जॉब्स तो लाँच करणार होते. त्या काळात त्यांना असे वाटत होते की, जेव्हा जेव्हा फोन लाँच होतो, त्या वेळी जी वेळ येते तीच वेळ फोनमध्ये आणि मागे चालू असलेल्या प्रेझेंटेशनमध्ये असावी. उदाहरणार्थ, फोन १२:१० वाजता लाँच झाला, तर ती वेळ प्रत्येक स्क्रीनवर दिसेल.

(हे ही वाचा : अमेरिका, दुबई, जपानपेक्षा iPhone 15 Series भारतात स्वस्त आहे की महाग? जाणून घ्या किंमत )

पण, लॉन्चिंग प्रेझेंटेशनमध्ये लागलेल्या वेळेच्या आधारे, अॅपलने फोन कधी लाँच केला जाईल, याचा अंदाज लावला. त्यानुसार, iPhone सकाळी ९:४१ ला लाँच होणार होता आणि वेळ ९:४२ AM होती. यावेळी फोन लाँच झाला तेव्हा ९:४२ AM होते आणि प्रत्येक डिस्प्लेवर फक्त ९:४२ AM दिसत होते.

तेव्हापासून ही यंत्रणा कार्यरत राहिली. पण २०१० मध्ये ही वेळ बदलली आणि ती वेळ सकाळी ९.४१ झाली, त्यानंतर हा ट्रेंड सुरूच आहे. त्यामुळे पहिला फोन लाँच केलेली वेळ प्रत्येक आयफोनच्या स्क्रीनवर दाखवली जाते. वेबसाइटवर जे फोन दिसतात, त्यामध्येही हीच वेळ दिसते. तुम्ही स्वत: ही अॅपल कंपनीच्या वेबसाइटवर अथवा गुगलवर जाऊन तपासू शकता.