जेव्हाही आपण एखादे इलेक्ट्रॉनिक उत्पादन घेतो तेव्हा त्याच्या पॅकिंगचा नक्कीच विचार करतो. तुम्ही जर कधी त्याचे पॅकिंग पाहिले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की प्रत्येक उत्पादनावर अनेक प्रकारची माहिती लिहिलेली असते. पण जवळपास प्रत्येक उत्पादनावर ‘CE’ असा टॅग लिहिलेला असतो.

बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याचा अर्थ जाणून घ्यायची देखील त्यांची इच्छा नसते. तुमचा मोबाईल चार्जर असो किंवा लॅपटॉप चार्जर, त्या सर्वांवर CE चिन्ह असते. वास्तविक हा एक विशेष टॅग आहे. याचा अर्थ काय ते जाणून घेऊया…

कॉल करण्यासाठी आता मोबाईल नेटवर्कची गरज नाही; ‘या’ फीचरमुळे कॉलिंग होणार सोपे

युरोपियन देशांमध्ये, १९८५ पासून सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मागील बाजूस हे सीई चिन्ह लागू केले गेले. पूर्वी हे चिन्ह CE ऐवजी EC असायचे. याचा अर्थ ‘कॉन्फॉर्माइट युरोपियन.’ उत्पादनावर या चिन्हाची उपस्थिती म्हणजे हे उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीने युरोपच्या मानकांची काळजी घेतली आहे.

खरे तर युरोपमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यासाठी काही मानके ठरवून दिली आहेत. जसे की इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी ‘लो व्होल्टेजचे नियम, सुरक्षितता आणि पर्यावरणाचे संरक्षण’ इत्यादी. सीई लिहिलेले सर्व उत्पादने बनवताना या गोष्टींची काळजी घेतली जाते. या चिन्हाचा अर्थ असा आहे की कंपनी या चिन्हासह उत्पादन कायदेशीररित्या बाजारात विकू शकते आणि अशी उत्पादने इतर देशांमध्ये निर्यात देखील केली जाऊ शकतात.

Story img Loader