चांद्रयान ३ ने २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केलं. विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आलं आहे. १४ दिवसांसाठी ही मोहीम चालणार आहे. रोव्हर विक्रम लँडरला जी माहिती पाठवेल ती विक्रम लँडर पृथ्वीवर पाठवणार आहे. मात्र १४ दिवसांनी काय होणार? चांद्रयान पृथ्वीवर परतणार का? हा प्रश्न आता चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ तास २६ मिनिटांनी विक्रम लँडरमधून रोव्हर आलं बाहेर

चांद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर जी धूळ उडाली ती खाली बसण्यास २ तासांपेक्षा जास्त कालावधी गेला. धूळ खाली बसण्याआधी रोव्हर बाहेर आलं असतं तर त्याच्यावर असलेल्या कॅमेरांवर धूळ बसली असती तसंच आतील उपकरणाचं नुकसान होऊ शकलं असतं. त्यामुळेच रोव्हर २ तास २६ मिनिटांनी बाहेर आलं. चांद्रयान १ या मोहिमेच्या वेळी चंद्रावर पाण्याचे अंश आढळले आहेत. आता रोव्हर प्रज्ञान याविषयी काय काय माहिती पाठवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचं आयुष्य १४ दिवसांचं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे काम करणार आहेत.

हे पण वाचा- चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करण्यासाठी झटलेले रिअल ‘हिरो’

१४ दिवसांनी नेमकं काय होणार?

१४ दिवस विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे काम करणार आहेत. कारण तोपर्यंत तिथे उन असणार आहे. १४ दिवसांनी मात्र या ठिकाणी अंधार होईल. अंधार झाल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोहोंचं काम थांबणार आहे. चंद्रावर जेव्हा परत सूर्य उगवेल त्यावेळी या दोन्हीचं काम पुन्हा सुरु होऊ शकतं. तसं घडलं तर भारतासाठी ती देखील आनंदाची बातमी ठरणार आहे.

चांद्रयान ३ पृथ्वीवर परतणार का?

चांद्रयान ३ पृथ्वीवर १४ दिवसांनी परत येणार का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्हीही चंद्रावरच राहणार आहेत.

हे पण वाचा- ‘चांद्रयान-३’ च्या यशानंतर माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांचा ‘तो’ फोटो होतोय व्हायरल, युजर्सनी केल्या अशा कमेंट्स

चांद्रयान ३ चे एकूण वजन किती आहे?

चांद्रयान ३ चे एकूण वजन ३९०० किलो आहे. प्रोपल्शन मॉड्यूलचे वजन २१४८ किलोग्रॅम आहे आणि लँडर मॉड्यूलचे वजन १७५२ किलो आहे, त्यात २६ किलोच्या रोव्हरचा समावेश आहे.

चांद्रयान ३ चं सॉफ्ट लँडिंग नेमकं कुठे झालं आहे?

चांद्रयान ३ चं सॉफ्ट लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झालं आहे. इस्रोने चांद्रयान ३ कुठे उतरणार आहे त्याचा फोटो आधीच ट्वीट केला होता. बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे.

प्रज्ञान रोव्हर बाहेर, आता रोव्हर कसं कार्य करणार?

प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरच्या बाहेर आल्याचं ट्वीट इस्रोनेच काही वेळापूर्वी केलं आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाची रासायनिक रचना कशी आहे ते तपासणार आहे. चंद्राची माती आणि खडक यांचं परीक्षणही करणार आहे. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे विक्रम लँडरमधून बाहेर आलेलं प्रज्ञान रोव्हर जो अभ्यास आणि निरीक्षण करेल ते संपूर्ण जगासाठी महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will chandrayaan 3 return to earth what will vikram pragyan do after 14 days scj
Show comments