५जी (5G) स्पेक्ट्रम लिलावानंतर आता ५जी नेटवर्क लाँच करण्यात आले आहे. संबंधित टेलिकॉम कंपन्यांनी आपली तयारी जवळपास पूर्ण केली आहे. एअरटेल या महिन्याच्या अखेरीस ५जी सेवा सुरू करू शकते, तर जिओनेही लवकरच ५जी सुरू करणार असल्याचे संकेत दिले आहेत. वर्षाच्या अखेरीस अनेक शहरांमध्ये वोडफोन आयडिया ५जी सुरू करेल अशी अपेक्षा आहे.

हे सगळं सुरु असताना, आपल्या फोनमध्ये ५जी काम करेल की नाही हा मोठा प्रश्न युजर्सना पडला आहे. कारण, बहुतेक लोकांचे स्मार्टफोन हे ५जी स्पेक्ट्रम लिलावापूर्वीचे आहेत. म्हणजेच, या स्मार्टफोन्सच्या निर्मितीच्या वेळी, भारतात ५जी नेटवर्क कोणत्या बँडवर उपलब्ध असेल हे निश्चित नव्हते.

हे सर्व स्पेक्ट्रम लिलावानंतर ठरले आहे, परंतु आता लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की सध्या ते वापरत असलेल्या स्मार्टफोनमध्ये ५जी चालेल की नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये ५जी काम करेल की नाही हे अगदी सोप्या पद्धतीने शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

Jio 5G असणार 4G पेक्षाही स्वस्त? जाणून घ्या, नव्या Tariff Planची अपेक्षित किंमत

  • सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जा.
  • येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी कनेक्शन (Connection) किंवा वायफाय आणि नेटवर्क (Wi-Fi & Network) या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला येथे सिम आणि नेटवर्क किंवा काही फोनमध्ये मोबाइल नेटवर्कचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला नेटवर्क मोडचा पर्याय मिळेल. जर प्रिफर्ड नेटवर्क टाइपमध्ये (Preferred Network Type) ५जी दिसले, तर तुमचा फोन ५जीला सपोर्ट करेल.

आपण इतर पद्धतींचा वापर करूनही, आपल्या फोनमध्ये ५जी चालेल किंवा नाही हे तपासू शकतो.

  • आपल्या स्मार्टफोन ब्रँडच्या वेबसाइटवर जा. येथे तुमच्या फोनचे मॉडेल शोधा.
  • स्पेसिफिकेशन्स सूचीमध्ये, तुम्हाला ५जी बँडबद्दल माहिती मिळेल. जर तुमचा फोन ५जीला आणि भारतात उपलब्ध बँडला सपोर्ट करत असेल, तर तुम्ही ५जी सेवा मिळवू शकाल.

Story img Loader