आजच्या काळामध्ये इअरबड्स वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाइलवर पिक्चर, व्हिडीओ किंवा गाणी ऐकण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच जर का आपण गाडी चालवत असून तरी देखील याचा मोठा उपयोग होतो. सध्या बाजारात अनेक कंपन्या चांगल्या फीचर्ससह आपले इअरबड्स लॉन्च करत आहे. विंग्ज लाइफस्टाइल हा भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स रिटेल क्षेत्रामध्ये झपाट्याने विकसित होणारा डायरेक्ट टू कन्झ्युमर ब्रँड आहे. कंपनीने आपला पहिला लाइफस्टाइल TWS इअरबड्स सेगमेंट ‘FloBuds 200’ लॉन्च केला आहे.
FloBuds 200 : फीचर्स
फ्लोबड्स हे टॅगलाईन साउंडशी कनेक्ट सर्वोत्तम ऑडीओचा अनुभव देतात. या बड्सच्या केसचे डिझाइन हे सेमी ट्रान्सपरंट आहे. त्यामध्ये अत्याधुनिकतेची भर घालण्यात आली आहे. यामुळे सर्वांचे लक्ष या इअरबड्सकडे आकर्षक होते. यामध्ये १३ मिमीचे हाय फिडेलिटी ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. जे प्रत्येक बीट आणि ताल स्पष्टपणे ऐकू येईल याची खात्री देतात. तसेच हे पूर्णपणे टच कंट्रोलवर चालते. घाम आणि पाण्यापासून वाचण्यासाठी यात IPX ५ सिस्टीम दिली आहे.
हे इअरबड्स एकदा चार्ज केले असता १० तासांची बॅटरी लाइफ वापरकर्त्यांना मिळेल. तसेच यात वापरकर्त्यांना ५० तासांचा प्लेटाइम मिळणार आहे. फ्लोबड्स २०० मध्ये ENC (एन्व्हायरोन्मेंटल नॉईज कॅन्सलेशन) टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. गर्दी असलेल्या रस्त्यावर किंवा कॅफेमध्ये या इअरबड्समधून तुम्हाला स्पष्ट आणि मोठ्याने आवाज ऐकू येतो. फ्लोबड्समध्ये गेमर्ससाठी विशेष फिचर मिळते. तसेच यात ४० एमएमपर्यंत अल्ट्रा लो लेटन्सी मिळते.
कंपनीचे सहसंस्थापक विजय वेंकटेश्वरन म्हणाले, “आम्हाला आमची पहिली नवीन लाइफस्टाइल टीडब्ल्यूएस इअरबड्स श्रेणी लॉन्च करताना आनंद होत आहे. फ्लोबड्स २०० चे आकर्षक डिझाइन आणि शक्तिशाली कार्यक्षमता या लॉन्चिंगसाठी परिपूर्ण आहे. हे प्रॉडक्ट ट्रेंडी डिझाइनवरील आमच्या फोकसवर भर देते. ज्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जाते. भारतातील तरुणांसाना यातील फीचर्स आधुनिक उद्योगाच्या ट्रेंडनुसार असल्याची खात्री देते.”