Airtel vs Jio vs Vi Recharge Plans: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) अलीकडेच दूरसंचार कंपन्यांना व्हॉइस आणि एसएमएस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर, Airtel, Jio आणि Vodafone Idea (Airtel, Jio, Vi) ने त्यांच्या ग्राहकांसाठी व्हॉईस आणि एसएमएस ओन्ली प्लॅन्स सादर केले. डेटा बेनिफिट नसलेल्या या प्लॅन्सला डेटा बेनिफिटसह बंडल रिचार्ज प्लॅनपेक्षाअधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच Airtel आणि Jio ने त्यांचे व्हॅल्यू प्लॅन अपडेट केले आहेत आणि सध्या TRAI या प्लॅन्सचे रिव्ह्यू करत आहे. आज आपण Airtel आणि Jio च्या नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये डेटा बेनिफिट उपलब्ध नाहीत. हे प्लॅन्स लाँच केल्यामुळे Airtel आणि Jio ने डेटा बेनिफिटचे काही व्हॅल्यू प्लॅन बंद केले आहेत.

एअरटेलचे नवीन व्हॉइस आणि एसएमएस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स

एअरटेलचा १८४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या १८४९ रुपयांच्या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह संपूर्ण वैधतेसाठी एकूण ३६०० एसएमएस ऑफर केले जातात. या प्लॅनसह एका दिवसाचा मोबाइलचा खर्च ५.०६ रुपये प्रतिदिन असेल.

एअरटेलचा ४६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या ४६९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ९०० एसएमएस ऑफर केले जातात. या प्लॅनसह, दररोजचा मोबाइल खर्च ५.५८ रुपये प्रतिदिन होईल.

जिओचे नवीन व्हॉइस आणि एसएमएस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स

१७४८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओचा हा प्लॅन एअरटेलपेक्षा अधिक किफायतशीर आहे, पण त्याची वैधता ३३६ दिवसांची आहे. या रिचार्जमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह एकूण ३६०० एसएमएस ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ सिनेमाचादेखील (JioCinema) एक्सेस मिळतो. जिओच्या या रिचार्जमुळे दररोजचा मोबाइल खर्च ५.२० रुपये प्रतिदिन होईल.

४४८ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

जिओच्या या रिचार्ज प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १००० एसएमएस ऑफर आहेत. जिओच्या या रिचार्जमध्ये तुम्हाला JioTV, JioCinema आणि JioCloud सारख्या जिओ सेवांचा मोफत एक्सेस मिळतो. या प्लॅनमुळे दैनंदिन मोबाइलचा खर्च दररोज ५ रुपये होईल.

वोडाफोन आयडियाचा नवीन व्हॉईस आणि एसएमएस ओन्ली रिचार्ज प्लॅन

Viचा १४६० रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Vi च्या या रिचार्ज प्लॅनची वैधता २७० दिवस आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज उपलब्ध आहेत. अतिरिक्त मेसेजबद्दल सांगायचं झाल्यास, तुम्हाला लोकल एसएमएससाठी १ रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपये द्यावे लागतील. या प्लॅनसह दररोजचा मोबाइल खर्च ५.४१ रुपये प्रतिदिन होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Without internet recharge plans airtel jio vi launches voice and sms only recharge plans cheapest prepaid recharge plans dvr