लास वेगास येथे Consumer Electronics Show पार पडला. हा या वर्षातील सर्वात मोठा टेक शो होता. या शोमध्ये सर्वच प्रमुख कंपन्यांनी आपल्या नवी प्रॉडक्ट्सचे लाँचिंग केले. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील सगळे प्रॉडक्ट हे लॅपटॉप्सशी संबधित होते. CES २०२३ मध्ये लाँच केलेले सर्वोत्तम लॅपटॉप्स आणि मॉनिटर्स क्युरेट करण्यात आले आहेत. सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रॉडक्टस या लिस्टमध्ये समाविष्ट आहेत.

Alienware X14 r2

Alienware X14 r2 हा जगातील सर्वात हलका १४ इंचाचा गेमिंग लॅपटॉप आहे. हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम लॅपटॉप आहे. यामध्ये १३ व्या जनरेशन इंटेल कोअर प्रोसेसर येतो आणि ८ जीबी व्हिडीओ मेमरी असे फीचर्स येतात. या लॅपटॉपमध्ये QHD+ रिझोल्यूशनसह १४-इंचाचा डिस्प्ले आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?

हेही वाचा : BMW बदलणार ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग; जाणून घ्या नक्की काय आहेत फीचर्स ?

Lenovo Yoga Book 9i

या लॅपटॉपने CES २०२३ मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लेनोवोचा लॅपटॉप फोल्ड करणे हे काही नवीन आहे. Lenovo Yoga Book 9i मध्ये ड्युअल १३ इंचाचा ओएलईडी टचस्क्रीन पॅनेल्स येतो. यामध्ये १३ व्या जनरेशनचा इंटेल कोअर प्रोसेसर येतो. तसेच १६ जीबी LPDDR5x रॅम आणि १ टीबी चा NVMe PCIe Gen4-आधारित SSD देखील या लॅपटॉपमध्ये येतो.

Asus ProArt Studiobook 16

पोर्ट स्टुडिओबुक १६ या लॅपटॉपमध्ये ३ डी टेक्नॉलॉजी येते. हा असा अनुभव देणारा जगातील पहिला लॅपटॉप आहे. जे वापरकर्त्यांना कोणत्याही चष्म्याशिवाय ३ डी चा अनुभव घेण्यास मिळतो. यामध्ये ३.२ के ओएलईडी स्क्रीन आणि लेंटिक्युलर लेन्सचा वापर करून कंपनीने हे यश संपादन केले आहे.

हेही वाचा : ऑक्सिजन लेव्हल कमी झालेल्या मुलाचे अँपल वॉचमुळे वाचले प्राण, जाणून घ्या नेमकं काय घडलं

Acer Predator Helios 18

हा Acer चा सर्वात शक्तिशाली गेमिंग लॅपटॉप आहे. हा लॅपटॉपमध्ये ३२ जीबी पर्यंत DDR5 रॅम आणि २टीबी पर्यंत PCIe Gen4 SSD देखील वापरकर्त्यांना ऑफर करतो. याचा डिस्प्ले १६इंचाचा आहे . Acer Predator Helios १८ मध्ये WUXGA (१९२०×१२००) किंवा WQXGA (२५६०×१६००) रिजोल्यूशन १६५Hz किंवा २४०Hz रिफ्रेश रेटसह १६:१आस्पेक्ट रेशो मिनी एलईडी डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप मार्च २०२३ पासून वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

Samsung ViewFinity S9

Samsung चा ViewFinity S9 हा सॅमसंगचा हाय-एंड मॉनिटर आहे ज्यामध्ये ५ के रिझोल्यूशन आणि २७ -इंच पॅनेल आहे ज्यामध्ये ९९ टक्के DCI-P३ वाइड कलर गॅमट कव्हरेज आहे. हा मॉनिटर स्मार्टफोन वापरून कलर कॅलिब्रेट केला जाऊ शकतो.